पाळधी ता. धरणगाव (प्रतिनिधी) येथील साईबाबा मंदिराजवळ आज सायंकाळी कारमधील दोघांवर चाकूहल्ला करून रोकड लांबविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना उघडकीस आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे.
यासंदर्भात अधिक असे की आज सायंकाळी साडेसात ते आठ वाजेच्या सुमारास पाळधी बायपास जवळील साईबाबा मंदिरालगत एका कारमधून येणाऱ्या दोघांवर चाकूहल्ला करून रोकड लांबविण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडल्याचे कळते. दरम्यान, कारमधील दोघे जण कापूस व्यापारी असल्याचीही माहिती समोर येत आहे. परंतु याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाहीय. दरम्यान, ते व्यापारी कोण? आणि हल्लेखोर कोण?, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळू शकलेली नाहीये. परंतु घटनास्थळी उभ्या असलेल्या कारमध्ये ड्रायव्हर सीटवर मोठ्या प्रमाणात रक्त सांडलेले असल्याचे दिसत असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा, पाळधी जवळ संदर्भातील घटनेला पोलिस सूत्रांनी दुजोरा दिला आहे.