रावेर (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावातील १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी अत्याचारातून ७ महिन्यांची गर्भवती खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी रावेर पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात पिडीत अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी तरुणाने साधारण सात महिन्यांपूर्वी (वेळ निश्चित) पिडीता घरी एकटी असतांना तीच्या सोबत जबरदस्तीने शारीरीक संबंध प्रस्थापित केले. तसेच यानंतर धमकी देत संधी साधून दोन ते तीन वेळा जबरदस्तीने शारीरीक संबंध करुन कोणास काही सांगीतले तर जिवे मारण्याची व बदनामी करण्याची धमकी दिली. यामुळे पिडीतेने भीतीपोटी कोणास काहीएक सांगीतले नव्हते. त्यानंतर पीडिता ही मागील वर्षी दसरा सन झाल्यावर तीच्या भाऊ सोबत ऊस तोडणीसाठी बारामती येथे गेली होती. यानंतर १५ दिवसापूर्वी गावी येथे परत आल्यावर पिडीतेचा पोटाचा आकार वाढत असल्याने तिला तीचे नातेवाईक सामान्य रुग्णालयात दाखल केले असता तेथे डॉक्टरांनी तपासून पीडिता ७ महीन्याची गर्भवती असल्याचे सांगीतले. याप्रकरणी संशयित आरोपी तरूणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.उप निरी. दिपाली पाटील ह्या करीत आहेत.