TheClearNews.Com
Tuesday, August 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जामनेरच्या प्रफुल्ल लोढा यांची मुंबईत सनसनाटी पत्रकार परिषद ; अनेक गंभीर आरोप !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 16, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) सत्ताधाऱ्यांकडून शासकीय यंत्रणेच्या गैरवापर करून एक सच्चा कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याचं सामाजिक कार्यकर्ता प्रफुल लोढा यांनी पत्रकार परिषदेत म्हंटले आहे. सुनिल झंवर सारख्या लोकांना पाठीशी न घालता सत्य जनतेपुढे आणावे, असंही ते म्हणाले.

काय म्हणाले प्रफुल्ल लोढा ?

READ ALSO

भरदिवसात धांडे नगरातील मंदिरात अल्पवयीन चोरट्यांचा डल्ला

वीजचोरीप्रकरणी आणखी दोन जणांवर गुन्हे दाखल

मी मागील २४ वर्षापासून आमदार गिरीश महाजन यांचे आरोग्यसेवेचे कार्य करीत होतो. परंतु ते मंत्री झाल्यापासून त्यांचे कार्य मला पसंद न पडल्यामुळे मी त्यांच्या विरोधात जात राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये प्रवेश केला. कोरोना काळात सामाजिक कार्य पूर्ण तालुक्यात अन्न वाटप, औषध वाटप, पि.पि.ई. किट वाटप, असे सामाजिक काम करायला लागलो. त्यावेळेला राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये एकनाथराव खडसे यांचा प्रवेश झाला आणि त्यानंतर माझ्यावर अन्यायाला सुरुवात झाली. दि. २७.११.२०२० रोजी मुंबई येथील माझ्या भावाकडे गुन्हा अन्वेषण विभागाकडून रेड टाकण्यात आली व माझ्या परिवाराला मानसिक त्रास सहन करावा लागला. त्यानंतर दि. २८.०४.२०१५ रोजी लासलगांव पोलीस ठाण्यात माझ्यावर खोटा खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसावर आजपर्यंत कोणताही गुन्हा दाखल नसताना, राजकीय पुढाऱ्यांनी माझ्यावर खंडणी सारखा खोटा गुन्हा दाखल केला.

तरी या जाहिर पत्रकार परिषदेतून मी महाराष्ट्रात गृहमंत्री यांना सांगू इच्छितो की, बी.एच.आर. पतसंस्थेचा गुन्हा व अन्वेषण विभाग येथील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांना सस्पेन्ड करून व सत्यवादी वकील उज्वल निकम साहेब यांच्या सारख्या वकीलाला देण्यात यावा.

बॉम्बस्फोटक पेक्षाही बी.एच.आर. हा घोटाळा हजारो लोकांचा जीवन-मरणाचा प्रश्न असल्यामुळे याची योग्य चौकशी करून व बी.एच.आर. पतसंस्थेची जे काही मिळकत आहे, ती लबाड लोकांनी खोटे लिलाव करून खरेदी केली आहे. तीप्रॉपर्टी शासन जमा करून जनतेचा पैसा जनतेला परत देण्यात यावा. या कामात विरोधीपक्ष नेत्यांनी ही सुनिल झंवरसारख्या लोकांना पाठीशी न घालता सत्य जनतेपुढे आणावे. त्याशिवाय देवेंद्र फडवणीस यांची भयमुक्त मुंबई मुंबई हे स्वप्न पूर्ण होणार नाही.

सुनिल झंवर व गिरीश महाजन सारख्या लोकांकडे बी. एच. आर. पतसंस्थेच्या घोटाळ्यात संशयाने बघीतले जाते. अशा लोकांना बरोबर घेवून तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करू शकत नाही. म्हणून फडवणीस साहेब आपण महाराष्ट्राचे उच्च पदस्थ व्यक्तिमत्व असून आपल्याकडे जनतेचा फार अपेक्षा आहे. पण मी आज जास्त काही बोलत नाही. आपल्याला सर्व वस्तुस्थिती मी मिडीया समोर येऊन मांडू शकत नाही. ती आपल्याला समक्ष भेटून २० तारखेनंतर केव्हाही समक्ष भेटून सांगेन. कारण मी कोणत्याही राजकीय पुढा-याचा विरोधात किंवा समर्थक नाही. पण बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पावन महाराष्ट्रात सत्याचा विजय झाला पाहिजे म्हणून मी आपल्याला सर्व हकीकत सांगणार आहे.

त्यामुळे कोणत्याही विकृतीच्या माणसाला जवळ न करता सत्ताधा-यांनी शासकीय यंत्रणेचा गैरवापर थांबवून आपण जनतेला न्याय मिळवून देण्याची भूमिका घ्यावी, हि नम्र विनंती. यापुढे माझ्यावर खोटे गुन्हा दाखल होवू शकतील. खोटे आरोपही होवू शकतील. कारण महाराष्ट्र शासनाच्या गृहमंत्रालयाने मराठा विदया प्रसारक संस्था, जळगाव यांना मागील दोन तीन वर्षापासून पोलीस बंदोबस्त दिलेला आहे. जर कुणाला घाबरून तेथे बंदोबस्त दिला असेल तर माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला जीवाला धोका असतांनाही पोलीस बंदोबस्त का नाही ?, असाही प्रश्न लोढा यांनी विचारला आहे.

महाराष्ट्रचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मला संरक्षण दयावे. तसेच बी. एच. आर. पतसंस्थेचा तपास सक्षम यंत्रणेकडे देऊन जनतेचे करोडो रुपये जनतेला मिळतील अशा पध्दतीने तपास करून जनतेला न्याय देण्याची भूमिका घ्यावी,असेही लोढा पत्रकार परिषदमध्ये म्हटलेय.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भरदिवसात धांडे नगरातील मंदिरात अल्पवयीन चोरट्यांचा डल्ला

August 11, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी आणखी दोन जणांवर गुन्हे दाखल

August 11, 2026
जळगाव

भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास

August 10, 2026
गुन्हे

धानोरा येथील शेतकऱ्याच्य खात्यावर सायबर डल्ला

August 10, 2026
जळगाव

महिला शक्ती संघातर्फे आरोग्य मार्गदर्शन व विहंगम योग शिबिर उत्साहात संपन्न ….

August 10, 2026
गुन्हे

दुकान फोडून चोरी करणाऱ्या सराईत चोराच्या अमळनेर येथून मुसक्या आवळल्या

August 10, 2026
Next Post

कृषी वीजबिलांत ५० टक्के सवलतीसाठी राहिले फक्त १५ दिवस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्ह्याला आज १३६० रेमडेसीवीरचे डोस मिळणार

April 12, 2021

Todays Horoscope : आजचे राशिभविष्य, ५ डिसेंबर 2023 !

December 5, 2023

जिल्ह्यात आज ६१ कोरोनाबाधित, ३४ झाले बरे ; ७ तालुके निरंक !

January 4, 2021

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, २ ऑगस्ट २०२४ !

August 2, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group