धरणगाव (प्रतिनिधी) येथील जवाहर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित निवासी मूकबधिर विद्यालयात इको फर्टीलायझर कंपनी यांच्या विद्यमानाने चादर वाटपाचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना शिवसेनेचे जळगाव लोकसभा सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी सांगितले की, दिव्यांग यांची सेवा हीच खरी ईश्वराची सेवा. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोच साधू ओळखावा देव त्याशी मानावा या उक्तीनुसार रंजल्या गांजल्या यांना ज्यांना कोणाचा आधार नाही ज्यांना खरोखर मदतीची गरज आहे. अशा दिव्यांगांना मूकबधिर यांना अंधांना मतिमंद यांना मदत करणे हेच आपले कर्तव्य आहे. असेच कर्तव्य आपण समाजातील इतरांना सुद्धा करावे आपली कंपनी आज पूर्ण जगात नावलौकिक आहे. समाजसेवेच्या माध्यमातून सुद्धा व्हावे हीच आमची अपेक्षा.
याप्रसंगी इको कंपनीचे व्यवस्थापक पाटील सो तसेच महाराष्ट्र ग्रंथालय सेनेचे राज्य उपप्रमुख तथा धरणगाव न पा चे माजी नगराध्यक्ष पी एम पाटील यांनी सुद्धा पालकांना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रम प्रसंगी निवासी मूकबधिर विद्यार्थ्यांचे पालक तसेच जळगाव जिल्हा सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, माजी नगराध्यक्ष पी एम पाटील, नगराध्यक्ष निलेश चौधरी, मुख्य प्रवर्तक एस व्ही पाटील, अनिल पवार, भाऊसाहेब पाटील, संचालक एकनाथ पाटील, शाळेचे मुख्याध्यापक वाल्मिक पाटील, आर एच पाटील, संतोष भडांगे सर्व मूकबधिर विद्यालयाचे कर्मचारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक आर एच पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन व संचालन संतोष भडांगे यांनी केले.