अमळनेर (प्रतिनिधी) संपूर्ण मानवजातीला लज्जित करणारी आणि कधी कल्पनाही करू शकत नाही अशी अत्यंत क्रूर गुन्हा बुधवारी अमळनेर पोलिसांत नोंदला गेला. शहरातील एका भागात एका नराधम बापाने मुलीवरच मागील दीड वर्षापासून वारंवार अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी १४ वर्षीय पिडीतेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे.
पिडीतेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सुमारे दिड वर्षापासून आई-वडील यांच्यात भांडण होत होते. भांडण झाल्यावर आई बाहेरगावी निघून जात असे. त्यामुळे वडिलांसोबत घरीच राहून पिडीता शाळेत जात असायची. परंतू नराधम सावत्र बाप रात्री घरी आल्यावर मुलीचे लैंगिक शोषण करायचा. पिडीतेने विरोध केला असता तुला आणि तुझ्या आईला मारेन अशी धमकी द्यायचा. वेळोवेळी आई बाहेर गावी गेल्यावर रात्रीच्या वेळेस नेहमीच नराधम बाप पिडीतेसोबत संबंध ठेऊ लागला होता.
भीतीने सदर प्रकाराबाबात पिडीतेने कुणालाही सांगितले नाही. २१ एप्रिल पासून वडिलांसोबत भांडण झाल्यापासून पिडीतेची आई भाहेर निघून गेली होती. १५ तारखेला वडिलांनी केलेला अत्याचारनंतर दीड वर्षापासून सुरु असलेला छळ पिडीतेला असहय झाला. दि. १८ रोजी आई आजीसह घरी परत आल्यावर दि १९ रोजी रोजी रात्रीच्या वेळेस आई व आजी यांना सदर घटनेबाबत पिडीतेने सविस्तर सांगीतले. त्यानंतर दि. २० रोजी पिडीतेने आईसोबत पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी तात्काळ नराधम बापाविरुद्ध गुन्हा दाखल पोस्कोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून घेतला असून पुढील तपास सपोनी हरीदास बोचरे हे करीत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे समाजमन सुन्न झाले आहे.