धरणगाव (प्रतिनिधी) येथील शिवसेना लांडगे गल्ली शाखातर्फे नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
समाज कार्यात नेहमी अग्रेसर असणारे शिवसेना उपजिल्हा प्रमुख पी एम पाटील यांची मराठा फाऊंडेशनच्या जिल्हा अध्यक्षपदी निवड झाली तसेच आरोग्य क्षेत्रात नेहमी अग्रेसर असणारे जैन समाजाचे मनीष भाऊ लाड यांची मेडिकल असोसिएशनच्या तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल, तसेच परीट समाजाचे जिल्हा संघटक छोटू भाऊ जाधव यांची मेडिकल असोसिएशनच्या तालुका सचिवपदी निवड झाल्याबद्दल सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी याचा सत्कार शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी उपस्थित शिवसेना उपशहर प्रमुख रवी जाधव युवा सेना उपतालुका प्रमुख कमलेश बोरसे, नगरसेवक नंदू पाटील, अशोक देशमुख,कैलास धनगर,योगेश पी पाटील,मोहन पाटील,दिनेश देशमुख,शाम पाटील,अरविद चौधरी उपस्थित होते सूत्रसंचालन विनोद रोकडे यांनी केले.