पाळधी ता. धरणगाव (प्रतिनिधी) जळगाव महापालिकेच्या महापौरपदी जयश्री सुनील महाजन तर उपमहापौरपदी कुलभूषण पाटील यांची निवड झाल्याबद्दल पाळधी येथील ना. गुलाबराव पाटील यांच्या संपर्क कार्यालयाच्या प्रांगणात शिवसेना, युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी पेढे वाटून, फटाके फोडून प्रचंड जल्लोष केला.
यावेळी जि. प. सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील युवा सेनेचे शहर प्रमुख आबा माळी मच्छूनाना कोळी, अनिल माळी, शेरीचे माजी सरपंच दत्तू ठाकूर, आव्हानीचे ग्रामपंचायत सदस्य विठोबा पाटील, भिकन राजपूत, शिवाजी पाटील, सादिक देशमुख, संजय महाजन, सुभाष नन्नावरे, यासह असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.