धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यात जांभोरे ग्रामपंचायतवर शिवसेना युवासेनेचे तरुण सरपंच म्हणून विशाल प्रकाश चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली. पालकमंत्री गुलाबराव पाटील व शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वाने जांभोरे ग्रामपंचायतवर प्रथमच राजपूत समाजाचा सरपंच करण्याची किमया केली.
यावेळी नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच किशोर भिल याचा सत्कार शिवसेना तर्फे करण्यात आला. तसेच सर्व नवनिर्वाचित सदस्यांमध्ये सरपंचपदी विशाल प्रकाश चव्हाण, उपसरपंचपदी किशोर सुपडू भिल, सदस्य अनिता वसंत गुजर, सदस्य मंगला सुरेश पवार, सदस्य निलाबाई नाना ठाकरे, सदस्य यशोदा परेश भिल, सदस्य अशोक केशव अहिरे, सदस्य बेबाबाई साहेबराव पाटील या सर्वांचे धरणगाव येथे गुलाबराव वाघ शिवसेना जिल्हाप्रमुख जळगाव यांनी अभिनंदन केले. यावेळी शहर प्रमुख राजेंद्र महाजन, धिरेंद पुरभे, संजय चौधरी, विलास पवार, मोहन महाजन, वाल्मिक पाटील उपस्थित होते.
गावतील प्राथमिक सोयींना प्रधान्य देणार
ग्रामीण भागातील शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने त्याचासाठी आवश्यक रस्ते गटार आरोग्य या सुविधा वर भर देण्यासाठी कटिबद्ध राहणार ना. गुलाबराव पाटील व शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ यांनी माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवेल, असे नवनिर्वाचित सरपंच विशाल प्रकाश चव्हाण यांनी सांगितले.
















