पाळधी ता. धरणगाव (प्रतिनिधी) शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रात शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. जळगाव ग्रामीण मतदारसंघातील पाळधी गावात शिवसपर्क अभियानाला सुरुवात झाले.
यावेळी हजारो शिवसैनिक व गावातील लोकांनी शिवसेना नोंदणी फ़ॉम भरून घेतले. यावेळी उपस्थित जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबरावजी पाटील. सभापती मुकुंदराव नन्नवरे, सरपंच अरुण पाटील, युवासेना शहर प्रमुख आबा माळी, अनिल माळी, ग्रामपंचायत तुषार मोरे, सुरेश नन्नवरे, प्रकाश मोर, शाम नन्नवरे, मिलींद नन्नवरे, आनंद प्रणय नन्नवरे, इंग्ले पवन नन्नवरे आदी उपस्थित होते.