धरणगाव (प्रतिनिधी) एरंडोल तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे अल्पवयीन दोन सख्या बहिणीवर एका नराधमाने दोन वेळा अत्याचार केल्याचा धक्कादायक घटना घडली आहे. अत्याचार करणाऱ्या नराधमाला अटक करण्यात आली असून याबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपीला अटकही करण्यात आली आहे.
एरंडोल तालुक्यातील एका गावात मध्य प्रदेशातील कुटुंब वास्तव्याला आहे. या कुटुंबात ११ वर्षीय व १३ वर्षीय या दोन सख्ख्या बहिणी वास्तव्याला आहे. घरातच राहणाऱ्या संशयित आरोपीने 10 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर च्या दरम्यान या नराधमाने दोन्ही अल्पवयीन सख्ख्या बहिणींवर दोन वेळा अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे एरंडोलसह धरणगाव तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
अत्याचार केल्यानंतर घरात कुणाला सांगितले तर दोघांना मारून टाकण्याची धमकी देखील आरोपीने दिली होती. दरम्यान पीडित मुलींनी हा प्रकार तिच्या आईला सांगितला त्यानंतर तिच्या आईने थेट धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली व संशयित आरोपी विरोधात तक्रार दिली. त्यानुसार धरणगाव पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार अधिनियम कायद्यानुसार संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मधुकर उंबरे हे करीत आहे.
















