TheClearNews.Com
Saturday, September 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक… जिल्हा परिषदेच्या ९२ कर्मचाऱ्यांचे दिव्यांगत्व बोगस

३२ कर्मचाऱ्यांचे दिव्यांगत्व १० टक्के पेक्षा कमी, ३११ कर्मचाऱ्यांची पताळणी पूर्ण

vijay waghmare by vijay waghmare
August 4, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – जिल्हा परिषदेच्या एकुण ६८९ दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पडताळणीचे फर्मान न्यायालयाने दिल्यानंतर गेल्या महिन्थापासून ही तपासणी वेगाने सुरू असुन आता पर्यंत ३११ कर्मचाऱ्यांचे अहवाल शासकीय वैदयकिय महाविदयालयाकडून आले आहे. त्यात धक्कादायक बाब म्हणजे तब्बल ३२ कर्मचाऱ्यांचे दिव्यांगत्व ० ते १० टक्के पर्यंत असुन अन्य ६० कर्मचाऱ्यांचे दिव्यांगत्व देखील ४० टक्के आतच असल्याची बाब समोर आली आहे.

दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या आदेशानुसार राज्यातील दिव्यांग कर्मचारी व दिव्यांग व्यक्तींच्या दिव्यांग प्रमाणपत्राची तपासणी मोहीम राबवण्यास गेल्या काही महिन्यापासून सुरूवात झाली आहे. या तपासणीला काही कर्मचाऱ्यांनी विरोध दर्शवत न्यायालयात दाद मागीतली होती. पण त्यानंतर न्यायालयाने १२० दिवसात पडताळणी करण्याचे सक्त आदेश दिले होते. त्यानुसार गेल्या महिन्यापासून जि. पच्या कर्मचाऱ्यांची दिव्यांग तपासणी शासकीय वैदयकिय महाविदयालयात सुरू आहे. ३११ कर्मचाऱ्यांचे अहवाल आले न्यायालयाच्या आदेशानुसार पुर्नपडताळणीत आता पर्यंत ६८९ पैकी ३११ कर्मचाऱ्यांची पुर्नपडताळणी झाली असुन त्यात ६० कार्मचाऱ्यांचे दिव्यांगत्व ४० टक्के पेक्षा कमी असल्याची बाब समोर आली आहे. या पडताळणीत कर्मचाऱ्यांच्या बोगस दिव्यांगत्वाचा कारनामा समोर येत आहे. या कर्मचाऱ्यांचे लाभकाढण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.

READ ALSO

‍विवेकानंद विद्यालयात महावितरणमध्ये ऊर्जा जागृती

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

दोन दिवसात पुन्हा आले ८० अहवाल

जि.पच्या ३११ कर्मचाऱ्यांचे अहवाल शासकीय रूग्णालयात आले असले तरी गेल्या दोन दिवसात पुन्हा ७५ ते ८० कर्मचाऱ्यांचे अहवाल पुन्हा आले आहे. ते ज्या त्या विभागाकडे असुन अदयाप सामान्य प्रशासन विभागाकडे आले नाही. कारवाईचा प्रस्ताव सामान्य प्रशासनाकडे आल्यानंतर त्यावर निर्णय होणार आहे.

पडताळणीसाठी आता महिनाभराचीच मुदत

काही कर्मचाऱ्यांनी या पडताळणी विरूध्द न्यायालयात धाव घेतल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने दिव्यांगत्व पडताळणी करण्यास परवनगी देवून १० टक्के पर्यंत दिव्यांग असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सक्तीची सेवानिवृत्ती देण्यास सांगितले. त्यातच न्यायालयाने १२० दिवसात कार्यवाही पुर्ण करण्याचे आदेश दिल्याने पडताळणीला गती मिळाली असुन ही पडताळणी न्यायालयाच्या आदेशाने ३ सष्टेबर पर्यंत पुर्ण करावी लागणार आहे. त्यामुळे बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

६० कर्मचाऱ्यांचे लाभ काढणार

दिव्यांगत्व पुर्नपडताळणी न्यायालयाच्या आदेशाने केली जात आहे. त्यात ज्या कर्मचाऱ्यांचे दिव्यांगत्व ११ ते ३९ टक्के दरम्यान आढळेल (जे ४० टक्के या किमान मर्यादेपेक्षा कमी आहे) त्यांचे दिव्यांगासाठीचे सर्व सेवा लाभ तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले असल्याने या आदेशान्वये जि.प ने ६० कर्मचाऱ्यांचे लाभ काढण्याची तयारी प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे.

२१९ कर्मचाऱ्यांचे दिव्यांगत्व खरे आता पर्यत ३११ कर्मचाऱ्यांची पुर्नपडताळणी झाली असुन त्यात २१९ कर्मचाऱ्यांचे दिव्यांगत्व ४० टक्के पेक्षा अधिक असल्याचा अहवाल शासकीय महादियालयाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कुठली ही कारवाई होणार नाही हे निश्चित झाले आहे.

३२ कर्मचाऱ्यांना मिळणार सक्तिची सेवानिवृत्ती

फेरपडताळणीमध्ये जे कर्मचारी दिव्यांग आढळणार नाहीत किंवा ज्यांचे दिव्यांगत्व १० टक्के पेक्षा कमी आढळेल, त्यांना विभागीय चौकशीनंतर सक्तीने निवृत्त केले जाणार आहे. यासाठी प्रशासनाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. यात ३२ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या कर्मचाऱ्यांची आधी विभागीय चौकशी होणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonShocking... Disability claims of 92 Zilla Parishad employees found to be bogus

Related Posts

जळगाव

‍विवेकानंद विद्यालयात महावितरणमध्ये ऊर्जा जागृती

September 19, 2026
गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
Next Post

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 07 ऑगस्ट 2026 !

August 7, 2026

भर रस्त्यातील वादात मध्यस्थी ठरली जीवघेणी ; चाकूने भोसकून तरुणाचा खून !

July 3, 2023

गुड शेपर्ड इंग्लिश मिडियम स्कुल येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन

January 12, 2022

Gold- Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण ; जाणून घ्या…काय आहे आजचा भाव !

April 3, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group