धरणगाव (प्रतिनिधी) येथे श्री संत सेना महाराज पुण्यतिथी प्रतिमा पूजन करून साजरी करण्यात आली.
कोरोनामुळे सर्व नाभिक समाज बांधव यांच्यावर उपासमारची वेळ आलेली होती, सलून दुकाने काही दिवसासाठी बंद ठेवण्यात आल्यामुळे नाभिक समाज बांधव हे हतबल झालेले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव आता कमी होत असतांना सलून दुकाने उघडण्यात आलीत. आता कुठे नाभिक बांधव यांच्या व्यवसायाची लाईन लागतेय. महाराष्ट्रमध्ये काही समाज बांधव यांनी कोरोनामुळे आपले जीवन आत्महत्या करून उध्वस्त केले होते. याची जाण ठेवून धरणगाव शहरात अत्यंत साध्या पध्दतीने संत शिरोमणी सेनाजी महाराज पुण्यतिथी साजरी करण्यात आली. प्रथमतः शिवसेना जळगाव जिल्हा सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.नन्तर समाज बांधव आनंद फुलपगार यांनी सपत्नीक आरती केली.यावेळी प्रमुख उपस्थितीत भा.ज.पा.नगरसेवक, तथा गटनेते कैलास माळी हे होते. प्रथमतः कैलास माळी यांनी आपल्या मनोगतात महाराजांन विषयी ईश्वर भक्तीचे व त्यांनी लिहिलेल्या अभंगाचे गुणगान केले.
अध्यक्षीय भाषणात शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, धरणगाव नाभिक समाज हा शांत व संयमी असून कोरोना काळात या समाज बांधवांना खुपच त्रास सहन करावा लागला. त्यांच्या उदरनिर्वाहचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता, तरी न खचता हा समाज बांधव पुन्हा जोमाने उभा राहिला हे खूप कौतूकास्पद आहे. समाज मंदिराच्या अपूर्ण राहिलेल्या बांधकामचे काम आम्ही आमदार निधीतुन किंवा सर्वांच्या सहकार्याने येणाऱ्या चार पाच महिन्याच्या काळात पूर्ण करू. असे आश्वासन गुलाबराव वाघ यांनी दिले.
ह्या छोटेखाणी कार्यक्रमास धरणगाव शहराचे नाभिक समाज अध्यक्ष सतीश बोरसे, गोपाळ फुलपगार, राजेंद्र अण्णा फुलपगार, मोहन फुलपगार, प्रशांत फुलपगार, आनंद फुलबाग, भरत परदेशी, बापूजी फुलपगार, कमलेश बोरसे, काशिनाथ फुलपगार, महेश फुलपगार, जगण फुलपगार, राजेंद्र बोरसे, हेमंत फुलपगार, गोरख फुलपगार, चंद्रकांत फुलपगार, विष्णू फुलपगार, भगवान बोरसे, प्रकाश फुलपगार, ताराचंद फुलपगार, सुभाष बोरसे, सुधाकर फुलपगार यांच्यासह असंख्य समाज बांधव उपस्थित होते. सूत्रसंचालन सतीश बोरसे यांनी केले तर आभार प्रदर्शन गोपाळ फुलपगार यांनी व्यक्त केले.