पाचोरा (प्रतिनिधी)तालुक्यातील अंतुर्ली येथील तरूणाचा अज्ञात मारेकऱ्यांनी धारदार शस्त्राने वार करून एरंडोल तालुक्यातील भातखंडे,उत्राण परिसरात निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना दि.18, शनीवार रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. अमोल उर्फ सोनू देविदास पाटील (४०, रा. अंतुर्ली ता. पाचोरा) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे.
अमोल पाटील हा व्यवसायिक आहे. दरम्यान, एरंडोल तालुक्यातील भातखंडे आणि उत्राण परिसरात अमोलचा मध्यरात्री अज्ञात मारेकऱ्यांनी धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून केल्याचे रविवारी, दि.19 सकाळी समोर आले आहे. दरम्यान, पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा केला. पुढील कारवाईसाठी मृतदेह जिल्हा रूग्णालयात नेण्यात आला आहे. नेमका हा खून करण्यामागचे कारण जरी समोर आलेले नसले तरी जुन्या वादातून झाल्याची चर्चा आहे. दरम्यान, आरोपींच्या शोधार्थ पथक रवाना झाले असून वाळू व्यवसायातील स्पर्धेतून खून झाल्याची देखील जोरदार चर्चा आहे.