TheClearNews.Com
Thursday, September 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम

प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण; पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

vijay waghmare by vijay waghmare
June 18, 2026
in जळगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव, (प्रतिनिधी) – केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना (PM-VBRY) या महत्त्वाकांक्षी योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर 19 जून रोजी देशभरात विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याच अनुषंगाने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO), जळगाव कार्यालयातर्फे जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.च्या जैन हिल्समधील गांधी तीर्थ येथील कस्तुरबा सभागृह येथे उद्या दि. 19 ला संध्याकाळी 4 वाजेला विकसीत भारत या संकल्पनेतून पीएम-व्हीबीआरवाय ह्या योजनेतील विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुमारे ₹2,400 कोटींचे प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना (डीबीटी) द्वारे हस्तांरीत केले जाणार आहे.

जळगाव येथील कर्मचारी भविष्य निधी संघटनेतर्फे प्रादेशिक कार्यक्रम आयोजित केला असून या कार्यक्रमास महाराष्ट्राचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटिल, जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिता वाघ, जळगावचे आमदार सुरेश भोळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. त्यांच्यासोबत विभागीय भविष्य निधी आयुक्त-2 मनोज कोळी, सहाय्यक भविष्य निधी आयुक्त मोहित दीक्षित उपस्थीत राहणार आहेत. या कार्यक्रमात जळगाव जिल्ह्यातील विविध उद्योगांचे प्रतिनिधी, नियोक्ते आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

READ ALSO

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

पीएम सूर्य घर व ‘स्मार्ट’ योजनेची माहिती आता तालुका पातळीवर; महावितरण उभारणार ‘किओस्क’

नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणाऱ्या मुख्य कार्यक्रमात केंद्रीय कामगार व रोजगार तसेच युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया, कामगार व रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे उपस्थीत असतील. पंतप्रधानांच्या हस्ते सुमारे ₹2,400 कोटींचे प्रोत्साहन अनुदान थेट लाभ हस्तांतरण (DBT) पद्धतीने वितरित केले जाईल. या माध्यमातून देशभरातील 15 लाखांहून अधिक नागरिकांना अतिरिक्त रोजगार संधी उपलब्ध होण्यास चालना मिळणार आहे. PM-VBRY ही रोजगारनिर्मितीला चालना देणारी केंद्र सरकारची रोजगार-संलग्न प्रोत्साहन योजना असून, प्रथमच संघटित क्षेत्रात रोजगार मिळविणाऱ्या कर्मचाऱ्यांना एका महिन्याच्या वेतनाएवढी, कमाल ₹15 हजारांची मदत दिली जाते. तसेच अतिरिक्त रोजगार निर्माण करणाऱ्या नियोक्त्यांनाही प्रोत्साहन अनुदान दिले जाते. देशभरात दोन वर्षांत 3.5 कोटींहून अधिक रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट या योजनेसमोर ठेवण्यात आले आहे. पुणे क्षेत्रात या योजनेअंतर्गत आतापर्यंत 75,711 कर्मचाऱ्यांना ₹42.79 कोटींपेक्षा अधिक लाभ, तर 6,351 नियोक्त्यांना ₹145.16 कोटींपेक्षा अधिक प्रोत्साहन वितरित करण्यात आले आहे. देशभरातील 200 ठिकाणी एकाचवेळी होणाऱ्या या कार्यक्रमात 9 हजार नियोक्ता प्रतिनिधी आणि 45 हजार कर्मचारी सहभागी होतील. कार्यक्रमांमुळे रोजगार निर्मिती, रोजगाराला प्रोत्साहन आणि सामाजिक सुरक्षेचा विस्तार या केंद्र सरकारच्या उद्दिष्टांना अधिक बळ मिळेल, जैन हिल्स येथे होणाऱ्या कार्यक्रमात जळगाव कर्मचारी भविष्य निधी संघटनेतील प्रादेशिक परिसरातील लाभार्थ्यांनी जास्तीत जास्त सहभागी व्हावे, असे आवाहन विभागीय भविष्य निधी आयुक्त-2 मनोज कोळी, सहाय्यक भविष्य निधी आयुक्त मोहित दीक्षित यांनी केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Jalgaon Special Program for the Prime Minister's 'Viksit Bharat Rojgar Yojana' at Jain Hills*

Related Posts

अमळनेर

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

September 16, 2026
जळगाव

पीएम सूर्य घर व ‘स्मार्ट’ योजनेची माहिती आता तालुका पातळीवर; महावितरण उभारणार ‘किओस्क’

September 16, 2026
जळगाव

अंधाराकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या अभियंत्यांचा अहोरात्र सेवेबद्दल सन्मान

September 16, 2026
गुन्हे

जून्या वादातून दोघ भावंडाकडून तरुणावर धारदार पट्टीने वार

September 16, 2026
गुन्हे

गुलाल अंगावर पडल्यामुळे बोलण्यासाठी गेलेल्या भावंडांवर दगडफेक

September 16, 2026
गुन्हे

अमळनेरात चोरट्यांनी दोन बंद घर फोडले

September 15, 2026
Next Post

Today's Horoscope आजचे राशीभविष्य 19 जून 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खरीप पिकांसाठी पाणी अर्ज करण्याचे आवाहन

September 7, 2020

चिंताजनक : जिल्ह्यात आज आढळले ३३८ कोरोनाबाधित !

January 23, 2022

भीषण अपघात : पुलावरून नदीत कोसळली बस, 15 जणांचा मृत्यू !

May 9, 2023

मित्र-शिक्षकांसमोर मारहाण; नैराश्यातून विद्यार्थ्याची आत्महत्या

February 17, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group