TheClearNews.Com
Sunday, March 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई; मागील वर्षेभरात दोन कोटींचा मुद्देमाल जप्त

The Clear News Desk by The Clear News Desk
January 14, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने मागील वर्षेभरात जानेवारी ते डिसेंबर २०२० या कालावधीत अवैध मद्य विक्री विरोधात राबविण्यात आलेल्या धडक कारवाईत एक कोटी अठ्याण्णव लाख एकोणतीस हजार एकतीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अशी माहिती सीमा झावरे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग यांनी दिली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने या कालावधीत एकूण १३५१ गुन्हे नोंदविलेले असुन यामध्ये वारस-५३९, बेवारस-८१२ गुन्हे दाखल करण्यात आले. यात ५५३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामध्ये मोहाफुले-१०० किलो, हातभट्टी दारु १८१७३ लि, देशी मद्य- ११०३.०९ ब.लि., विदेशी मद्य-१८०७.३ ब.लि., बीअर १०९.२९ ब.लि. तसेच बनावट देशी मद्य-४२३.३६ ब.लि. बनावट विदेशी मद्य-२५.९ ब.लि., परराज्यातील मद्य-९.७५ ब.लि., बनावट ताडी ५६१ लिटरचा समावेश आहे. यात ५५ दुचाकी व ६ चारचाकी वाहनांचाही समावेश असून वर्षेभरात १ कोटी ९८ लाख २९ हजार ३१ इतक्या रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ग्रामपंचायत निवडणूक काळात ३४ गुन्ह्यांची नोंद तर १९ आरोपींना अटक त्याचबरोबर जिल्ह्यात सुरु असलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या काळातही विभागाने १ ते १३ जानेवारी, २०२१ या १३ दिवसांमध्ये एकूण ३४ गुन्हे नोंदविले असुन यात वारस-१४, बेवारस-२० गुन्हे दाखल करण्यात आले असुन यामध्ये एकूण १९ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर हातभट्टी दारु-५११ लि, देशी मद्य- ७.७४ ब.लि., बीअर १.९५ ब.लि., तसेच बनावट विदेशी मद्याच्या एम्पेरीयल ब्यु व्हीस्कीच्या १८० मि.ली. च्या ५०० सिलबंद बाटल्या, विदेशी मद्याचा तयार ब्लेंड, बुचे रिकाम्या बाटल्या, ३ दुचाकी वाहने, १ (टाटा सुमो) चारचाकी वाहन असा एकुण १५ लाख ७४ हजार ६२७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शिवाय या कालावधीत वरील गुन्ह्यांपैकी एकुण ३ गुन्हात्म गुन्हे नोंदविण्यात आले असुन यामध्ये तीन बनावट दारुचे कारखाने उध्दवस्त करण्यात आले आहे. या गुन्ह्यातील कारवाईत बनावट विदेशी मद्य तयार करण्याकरीता लागणारे साहित्य स्पीरीट, ३ बॉटलींग मशिन, हायड्रोमिटर, विदेशी मद्याचा तयार ब्लेंड, बुचे रिकाम्या बाटल्या व तसेच मद्यार्क-३५० ब. लि., बनावट देशी/ विदेशी मद्य ८५० ब.लि, एक दुचाकी वाहन व तीन चार चाकीवाहने असा एकुण २० लाख ६१ हजार ९९१ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

READ ALSO

कॉलनींना पुरवठा करणारी लाईन लिकेज; प्रशासनाचे दुर्लक्ष उघड

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

जिल्ह्यात हातभट्टी व अवैध मळी/मद्य/मद्यार्क याची निर्मिती, विक्री, वाहतुक, आयात, निर्यात, खरेदी व बाळगणे महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ अंतर्गत अजामीनपात्र गुन्हा असुन किमान ३ ते ५ वर्ष कारावास किंवा २५ ते ५० हजार रुपयांचा दंड किंवा दोन्ही इतक्या शिक्षेची तरतुद आहे. अशा बेकायदेशीर व्यवसायीची माहिती देणा-या इसमांचे नाव गोपनीय ठेवण्यात येते व शासनाने विहित केल्यानुसार खबरीस भरीव बक्षीस देण्यात येईल. याकरीता विभागाने संपर्क क्रमांक, विभागाचा व्हॉटसॲप क्रमांक, टोल फ्री क्रमांक ई-मेल आयडी इत्यादी माहिती असलेले जाहिर सुचनेचे फलक जिल्ह्यातील प्रत्येक गावांमध्ये लावले असून सीमावर्ती भागातील छोट्या गावांमधून राज्यात येणारे रस्ते किंवा खुशकीच्या मार्गावरुन महाराष्ट्र राज्यात परराज्यातील अवैध मळी / मद्यार्क / मद्याची वाहतुकीस आळा बसविणे कामी व अशा अवैध धंद्याची माहिती मिळविण्यासाठी सीमावर्ती भागातील स्थानिक लोकांमध्ये जनजागृती करुन सहभाग वाढवण्याकरीता त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व सीमा तपासणी नाके, गांवामधून राज्यात येणारे रस्ते व खुशकीच्या मार्गावर जाहीर सुचनाचे फलकही लावण्यात आल्याचे झावरे यांनी कळविले आहे.

ग्रामपंचायत निवडणूकीत अवैध मद्य विक्रीवर आळा बसण्यासाठी विशेष भरारी पथकाची नियुक्ती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिलेल्या आदेश व सुचनांप्रमाणे तसेच कांतीलाल उमाप, आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई, उषा वर्मा, संचालक, (अंमलबाजवणी व दक्षता) राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई, अर्जुन ओहोळ, विभागीय उप आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, नाशिक विभाग, नाशिक यांनी वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभाग, जळगाव कार्यालयाकडुन अवैध मद्य विक्रीवर आळा बसण्यासाठी जिल्ह्यात एक विशेष भरारी पथक व इतर पाच पथके यांचेकडुन अवैध मद्य विक्री विरुध्द कठोर कारवाई करण्यात येत असल्याचेही झावरे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

कॉलनींना पुरवठा करणारी लाईन लिकेज; प्रशासनाचे दुर्लक्ष उघड

March 21, 2026
गुन्हे

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

March 21, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांचा विधानसभा-विधानपरिषद अभ्यास दौरा;

March 20, 2026
कृषी

चाळीसगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान;

March 20, 2026
गुन्हे

बोगस केळी विमा घोटाळाप्रकरणी जळगाव तालुक्यातील ८ सीएससी सेंटर चालकांविरुद्ध गुन्हा

March 20, 2026
Next Post

४२ कोटींच्या कामांना मंजुरी, शहरातील विकासकामे मार्गी लागणार : महापौर भारती सोनवणे यांची माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चोपडा नगरपरिषद रुग्णालयाचा कायापालट ; अतुल सुफल गुजराथी यांचे अजुन एक सामाजिक कार्य

May 14, 2022

संसदेतील शिवसेना कार्यालय ताब्यात घेण्यासाठी शिंदे गटाच्या हालचाली, लोकसभा अध्यक्षांना दिलं पत्र !

July 19, 2022

शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह पोस्ट ; शिवसैनिकांनी एकाला चांगलेच चोपले

March 24, 2022

First-ever auction of AI-created artwork set for Christie’s gavel

June 30, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group