TheClearNews.Com
Thursday, June 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अमळनेरात अवतरणार अत्याधुनिक जलतरण तलाव ; आमदार अनिल पाटलांचे यशस्वी प्रयत्न

The Clear News Desk by The Clear News Desk
May 29, 2021
in अमळनेर
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) अवघ्या दीड वर्षांच्या कालावधीत अमळनेरचा ऐतिहासिक दगडी दरवाजा, पाडळसरे प्रकल्पासाठी १३५ कोटी, क्रीडा संकुलासाठी ५ कोटी, शहरात वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत अडीच कोटी यासह ग्रामिण रस्ते आणि बंधाऱ्यांसाठी भरीव असा निधी उपलब्ध करणाऱ्या आमदार अनिल पाटलांनी तरुणाईला विशेष आकर्षण असणाऱ्या जलतरण तलावास प्रशासकीय मान्यता मिळविली असून तब्बल २ कोटी ५६ लक्ष निधीतून हा अत्याधुनिक पद्धतीचा जलतरण तलाव अमळनेरात अवतरणार आहे.

सदर प्रकल्पासाठी अमळनेर न प च्या वतीने माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील व नगराध्यक्षा सौ पुष्पलता पाटील यांनी देखील आमदारांच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा केला होता,विशेष म्हणजे जळगाव, धुळे, नंदुरबार व नाशिक या चार जिल्ह्यात एकमेव अमळनेरातच या जलतरण तलावास मंजुरी मिळाल्याने महाविकास आघाडी सरकार अमळनेर मतदारसंघावर खरोखरच विशेष मेहरबान असल्याचे आमदारांनी सिद्ध केले आहे.अमळनेर नगरपरिषदेच्या माध्यमातूनच शहर हद्दीत हा जलतरण तलाव साकारला जाणार आहे.महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या माध्यमातून क्रीडा सुविधा निर्मितीसाठी आर्थिक सहाय्य या योजनेंतर्गत अमळनेर पालिकेस ही मंजुरी मिळाली असून या बाबतचा शासन आदेश दि. २७ मे २०२१ रोजी संबधित विभागाचे उपसचिव स्वा.म.नानल यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध झाला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार आणि क्रीडा मंत्री ना. सुनिलजी केदार, राज्यमंत्री ना. आदीतीताई तटकरे यांच्या सहकार्याने ही मंजुरी मिळाली असल्याची माहिती आ. अनिल पाटील यांनी दिली. तसेच ही प्रशासकीय मान्यता असून आता निधीसाठी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजितदादा पवार यांच्याकडे तात्काळ पाठपुरावा करून लवकरच निधीची उपलब्धता करत प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्याचे संकेत आमदारांनी दिले आहे.

READ ALSO

खवशी येथे दोन गटात तुफान हाणामारी

किरकोळ कारणावरून बाप, लेकाला मारहाण

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण करण्यास मिळणार चालना

पूर्वी अमळनेर म्हणजे नामांकित खेळाडूंची भूमी होती कुस्ती असो किंवा कोणतेही खेळ असो अमळनेर प्रताप महाविद्यालयाच्या माध्यमातून अनेक खेळाडू निर्माण होऊन राज्य व राष्ट्रीय पातळीवर त्यांनी मजल मारली होती, खेळाडूंची ही खंडित झालेली परंपरा पुन्हा प्रज्वलित करण्याची धरपड आमदारांची असून हा जलतरण तलाव त्याचाच एक भाग आहे. याआधी अमळनेर येथील प्रलंबित असलेल्या तालुका क्रीडा संकुलाकडे देखील आमदारांनी लक्ष वेधून स्वखर्चासह इतरांच्या सहकार्याने स्वच्छतेसह ट्रॅक व विविध मैदानांची निर्मिती केल्याने हे क्रीडा संकुल खेळाडूंनी फुलू लागले असून लवकरात लवकर हे क्रीडा संकुल पूर्णत्वास आणण्याचा ध्यास आमदारांचा आहे त्यासाठी नुकतीच ५ कोटी निधीस प्रशासकीय मान्यता आमदारांनी मिळविली असून तो निधी उपलब्ध करण्यासाठी देखील जोमाने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.तरुणाईला क्रीडा सुविधा निर्मितीच्या उद्देशानेच आमदारांनी हा जलतरण तलाव प्राधान्याने मंजूर करून आणला असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय निर्माण करण्यास चालना देणे हाच या योजनेचा उद्देश आहे,या योजनेंतर्गत क्रीडा सुविधा निर्माण करण्यासाठी त्याचप्रमाणे क्रीडा साहित्यासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करण्यात येणार आहे. सदर जलतरण तलावामुळे खेळाडू निर्माण करण्यास चालना मिळण्यासोबतच स्विमिंग तथा जलतरण या विशेष फायदेशीर व्यायामाची देखील अमळनेरात सोय होणार आहे. सदर प्रकल्पासाठी आमदार अनिल पाटील यांना अमळनेर न प च्या नगराध्यक्षा सौ. पुष्पलता पाटील व नगरसेवक यांचेही सहकार्य लाभत असल्याचे आमदारांनी सागितलं.

अत्याधुनिक स्विमिंग पूल पाहण्यासाठी अमळनेरातुन जाणार टीम

यासंदर्भात आमदार अनिल पाटील यांनी माहिती देताना सांगितले की सुमारे २.५६ कोटी निधीतून होणारा हा जलतरण तलाव संपूर्ण अत्याधुनिक पद्धतीचा होऊन त्यात कोणत्याही त्रुटी राहू नयेत यासाठी राज्यातील काही चांगले जलतरण तलाव पाहण्यासाठी आणि त्यांची माहिती जाणून घेण्यासाठी बांधकाम क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींच्या टीमला पाठविण्याचे नियोजन आपण करीत असून सदर जलतरण तलाव नेमका कुठे सकारावा यासाठी नगराध्यक्षा आणि पालिका पदाधिकारी व अधिकारी यांच्याशी चर्चा करून योग्य निर्णय घेणार आहोत,सदर जलतरण तलावात महिला,पुरुष व लहान बालकांसाठी स्वतंत्र सोय असणार असून लहान मोठ्या स्पर्धाही भविष्यात येथे होऊ शकतील,पाण्याची उपलब्धता, रिसायकलिंग,शुद्धीकरण आदी संपुर्ण बाबी विचारात घेऊन आणि राज्यातील चांगले जलतरण तलाव डोळ्यासमोर ठेवून आणि यातील तज्ज्ञ व्यक्तींना सोबत घेऊन हा प्रकल्प लवकरच निर्माण करून अशी ग्वाही आमदार पाटील यांनी दिली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

खवशी येथे दोन गटात तुफान हाणामारी

June 17, 2026
अमळनेर

किरकोळ कारणावरून बाप, लेकाला मारहाण

June 15, 2026
अमळनेर

अमळनेर बसस्थानकातून पोत चोरणाऱ्या २ महिलांना २ तासात केली अटक

June 14, 2026
अमळनेर

रोटवद येथील तरुणाचा अपघातात मृत्यू

June 10, 2026
अमळनेर

बनावट मुद्रांकाचा वापर करुन शासनास फसवणाऱ्या तिघांवर गुन्हा

June 7, 2026
अमळनेर

अमळनेर पालिकेच्या कर्मचाऱ्याचे ऑनलाईन ९५ हजार लांबवले

June 7, 2026
Next Post

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील : पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ॲटो डाऊनलोड सेटींगमुळे जळगावात व्यावसायिकाला साडेचार लाखांचा गंडा !

October 13, 2025

दहिवद आरोग्य उपकेंद्रात लसीकरण

April 5, 2021

जैन उद्योग समूहाने ‘स्नेहाची शिदोरी’ उपक्रमातून भागवली लाखो लोकांची भूक

April 18, 2021

माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेंतर्गत कानळदा येथे घरोघरी जाऊन दुसऱ्या टप्प्यात यशस्वी काम सुरू

April 3, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group