TheClearNews.Com
Friday, August 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

युवा सेनेचे नाशकात “झंझावात” राज्यव्यापी पदाधिकारी अधिवेशन

The Clear News Desk by The Clear News Desk
December 25, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांचे “झंझावात” हे राज्यव्यापी अधिवेशन ८ आणि ९ जानेवारी २०२२ रोजी नाशिकला होत आहे. राज्यातील आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित या मेळाव्याला विशेष महत्त्व असून युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांसाठी एकप्रकारे ही पर्वणीच ठरणार आहे. डॉ. एपीजे अब्दुल कलाम कन्व्हेन्शन सेंटर, नानाच्या मळ्याजवळ, पपय्या नर्सरी (सातपूर) येथे होणाऱ्या या मेळाव्यास राज्याच्या कानाकोपऱ्यातून युवासेनेचे २००० पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, अधिवेशनाच्या तयारीबाबत युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी नाशिकला भेट देऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच अधिवेशन यशस्वी करण्याचे आवाहन केले.

आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या शिरावर मोठी जबाबदारी येणार असून ती पार पाडण्यासाठी ही फळी किती तत्पर आहे. याची चाचपणीही या दोन दिवसांच्या नाशिक अधिवेशनात होणार असल्याचे वरुण सरदेसाई यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले. वरुण सरदेसाई यांनी नंतर अधिवेशन स्थळाची पाहणीही केली. नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांची भेट घेऊन त्यांच्याबरोबर महानगरातील कायदा व सुव्यवस्था तसेच इतर अन्य प्रश्नांवर चर्चा केली. अधिवेशन यशस्वी करण्यासाठी आम्ही सर्व कसोशीने प्रयत्न करू, असे युवासेना सहसचिव विराज कावडीया यांनी सांगितले.

READ ALSO

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पोहतांना बुडून मृत्यू

नियोजनाच्या शिवसेना नाशिक संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, शिवसेना नाशिक जिल्हाप्रमुख विजय करंजकर, युवासेना कोषाध्यक्ष व नगरसेवक अमेय घोले, सुप्रदा फातर्पेकर, युवासेना सहसचिव विराज कावडीया, युवासेना विस्तारक सिद्धेश शिंदे, अजिंक्य चुंभळे, युवासेना जिल्हाधिकारी दीपक दातीर, राहुल ताजनपुरे आदींसह युवासेनेचे जिल्हा व महानगरातील पदाधिकारी उपस्थित होते.

आदित्य ठाकरे यांच्या भाषणाने समारोप होणार

युवासेना प्रमुख तसेच पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, परिवहनमंत्री अनिल परब, कृषिमंत्री दादा भुसे, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, प्रियंका चतुर्वेदी यांच्यासह अन्य मंत्री अधिवेशनास उपस्थित राहून उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. ९ जानेवारीला होणाऱ्या अधिवेशनाच्या पहिल्या सत्राचे उद्घाटन एकनाथ शिंदे करतील तर समारोप संजय राऊत यांच्या भाषणाने होईल. तसेच दुसऱ्या सत्राचा शुभारंभ सुभाष देसाई करणार आहेत. तर अधिवेशनाचा समारोप आदित्य ठाकरे यांच्या भाषणाने होईल.

जळगाव जिल्ह्यातून युवासेना सहसचिव विराज कावडीया, युवासेना जिल्हा युवाधिकारी शिवराज पाटील, चंद्रकांत शरण यांच्या नेतृत्वात ४८ पदाधिकारी अधिवेशनात सहभागी होणार आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील व जिल्ह्यातील समस्त आमदार, शिवसेना पक्ष पदाधिकारी यांनी युवासैनिकांना अधिवेशनासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
गुन्हे

मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पोहतांना बुडून मृत्यू

August 6, 2026
गुन्हे

नशिराबाद टोलनाक्याजवळ कंटेनरच्या धडकेत तरुण जागीच ठार

August 6, 2026
भुसावळ

वाढत्या स्पर्धेच्या युगात ‘ब्रेकींग महाराष्ट्र’ने जपली विश्वासार्हता ः भुसावळात मंत्री संजय सावकारे

August 5, 2026
गुन्हे

साडेबारा लाखांची बॅग लांबवणारी टोळी आंध्रप्रदेशातील!

August 5, 2026
क्रीडा

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

August 4, 2026
Next Post

Christmas 2021: हॅपी ऐवजी 'मेरी ख्रिसमस' का म्हटले जाते ? ; जाणून घ्या.. ख्रिसमसबद्दल खास गोष्टी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव एलसीबीच्या पथकाने सराईत गुन्हेगाराला पुण्यातून घेतले ताब्यात ; भर पावसात रचला होता सापळा

July 9, 2024

जिल्ह्यात १४ नोव्हेंबरपासून राबविला जाणार अनाथ प्रमाणपत्र पंधरवाडा

November 6, 2020

यावल : पाण्याची मोटार लावायला गेली अन् १४ वर्षीय मुलीसोबत घडलं भयंकर !

May 13, 2023

धक्कादायक ! आधी मुलाला पुलावरून ढकललं मग महिलेनेही नदीत उडी घेऊन केली आत्महत्या

June 17, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group