जळगाव प्रतिनिधी । कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ मध्ये आज पर्यंत बऱ्याच स्टॅच्यू तरी पोस्ट या रिक्त आहेत. त्यासाठी वारंवार विद्यापीठाकडे मंत्री महोदय इकडे अर्ज त्याबाबत पुनर्निरीक्षण अर्ज हे दाखल करून देखील आजतागायत त्या नियुक्त्या केल्या गेलेल्या नाहीत. वित्त व लेखा अधिकारी, कुलसचिव, संचालक परीक्षा मूल्य मापन मंडळ यांच्या रिक्त जागी महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम २०१६ चे कलम ८(५) नुसार योग्य त्या व्यक्तीची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करण्यात आली आहे.
निवदेनात म्हटल्याप्रमाणे, उपरोक्त विषयानुसार आपणास विनंती की आमच्या कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ मध्ये आज पर्यंत बऱ्याच स्टॅच्यू तरी पोस्ट या रिक्त आहेत. त्यासाठी वारंवार विद्यापीठाकडे मंत्री महोदय इकडे अर्ज त्याबाबत पुनर्निरीक्षण अर्ज हे दाखल करून देखील आजतागायत त्या नियुक्त्या केल्या गेलेल्या नाहीत. परंतु विद्यापीठ अधिनियम 2016 चे कलम 85 नुसार विद्यापीठांच्या कुलगुरूंनी सहा महिन्यापर्यंत वरील तीनही जागा भरता येतात परंतु त्यानंतर महाराष्ट्र शासन यांची परवानगी घेऊन त्या जागेवर कायमस्वरूपी व्यक्ती यांची नेमणूक करणे गरजेचे आहे परंतु आमच्या कवच उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अशी कुठलीही पद्धत अवलंबली जात नसून त्यासाठी आपणास या माध्यमातून करत आहोत. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आजपर्यंत एका विशिष्ट विचारसरणीचे लोक यांची हुकूमशाही चालू होती व ती मोडीत काढण्यासाठी आपणास कळकळीची विनंती की सदर जागी लवकरात लवकर नवीन व्यक्तींची नेमणूक करून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ होणार नाही, याची नोंद घ्यावी, अशी विनंती अँड कुणाल पवार, भूषण भदाणे, कल्पिता पाटील आणि गणेश निंबाळकर यांच्यातर्फे करण्यात आली आहे.