TheClearNews.Com
Thursday, February 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नशिराबाद येथे उपजिल्हा रूग्णालय उभारण्यात येणार ; पालकमंत्र्यांची घोषणा

नशिराबाद (सुनिल महाजन)

The Clear News Desk by The Clear News Desk
February 13, 2022
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

नशिराबाद (सुनिल महाजन) जिल्ह्यातील नशिराबाद हे मोठ्या लोकवस्तीचे शहर असून वाढीव लोकसंख्येची गरज आणि महामार्गाला लागून असल्यामुळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा दर्जा वाढवून येथे उपजिल्हा रूग्णालय उभारण्यात येणार असल्याची घोषणा पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी केली. येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीच्या लोकार्पण पालकमंत्र्यांच्याहस्ते करण्यात आले.

पालकमंत्र्यांनी सांगितले की, नशिराबादच्या विकासासाठी आपण भरीव निधी दिला असून यातील दोन कोटीच्या रस्त्यांची कामे आणि नगरपंचायतीच्या इमारतीच्या कामांची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आलेली आहे. विकासकामांमध्ये कोणताही भेदभाव न करता नशिराबाद वासियांना सुविधा देण्यासाठी आपण कटीबध्द असून येत्या काळात नशिराबादचा कायापालट झालेले आपल्यास दिसेल अशी ग्वाही देखील पालकमंत्र्यांनी दिली. तर प्राथमिक आरोग्यउप केंद्र हे रूग्णसेवा केंद्र बनावे अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली.

READ ALSO

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

बापरे! खेळण्यातील नोटा देऊन व्यापाऱ्याला 6 लाखात लुटले

नशिराबाद येथील गरज लक्षात घेऊन येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असावे अशी मागणी स्थानिक शिवसेना पदाधिकार्‍यांनी व जि प उपाध्यक्ष लालचंद पाटील यांनी पालकमंत्र्यांकडे केली होती. यावर ना.गुलाबराव पाटील यांनी तातडीने यासाठी उपलब्ध असणार्‍या जागेची पाहणी करून प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी तब्बल साडेचार कोटी रूपयांचा निधी जिल्हा नियोजन मंडळातून उपलब्ध करून दिला असून याचे काम सुरू झालेले आहे. यासोबत नशिराबादकरांची गरज लक्षात घेऊन पालकमंत्र्यांनी दीड कोटी रूपयांचा निधी देऊन आरोग्य उपकेंद्राचे काम पूर्ण केले. याच प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद अध्यक्षा रंजनाताई पाटील जि.प.उपाध्यक्ष लालचंद पाटील, जामनेर च्या नगराध्यक्षा साधनाताई महाजन अतिरिक्त कार्यकारी मुख्य अधिकारी मोहन साहेब, जिल्हा आरोग्य अधिकारी भीमाशंकर जमादार, तालुका वैद्यकीय अधिकारी संजय चव्हाण, नशिराबाद वैद्यकीय अधिकारी ईरेश पाटील माजी सरपंच विकास पाटील माजी उपसरपंच किर्तिकांत चौबे, भाजप शहराध्यक्ष प्रदीप बोढरे, शिवसेना शहरप्रमुख विकास धनगर, युवासेनेचे चेतन बर्‍हाटे, तत्कालीन सरपंच विकास पाटील, धरणगाव पंचायत समितीचे माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, चंद्रकांत भोळे, शिक्षण मंडळाचे अध्यक्ष योगेश पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य सुवर्णा महाजन, भाजपा तालुका अध्यक्ष गोपाळ भंगाळे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद पाटील, शोएब पटेल, माजी शिक्षण व आरोग्य सभापती कमलाकर रोटे, वैशाली पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

जि प चे उपाध्यक्ष लालचंद पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकातून शहराच्या विकासासाठी पालकमंत्र्यांनी केलेल्याभरीव सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानून शहरात अजून आवश्यक असणार्‍या कामांची मागणी केली.

गुलाबभाऊ म्हणजे काम करणारे पालकमंत्री !

जिल्हा परिषद अध्यक्षा रंजनाताई पाटील यांनी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या कामाचे आणि सहकार्याचे कौतुक केले. त्या म्हणाल्या की, आम्हाल आजवर कधीही निधीची अडचण आली नाही. भाऊंनी निधी प्रदान करतांना कधीही पक्षीय भेद मानला नाही. यामुळे कामांना गती आलेली आहे. यामुळे खर्‍या अर्थाने काम करणारे पालकमंत्री म्हणजेच गुलाबभाऊ असल्याचे तोंड भरून कौतुक त्यांनी केले. तर जि.प. उपाध्यक्ष लालचंद पाटील यांनी देखील भाऊंच्या कौतुक केले.

पालकमंत्र्यांनी आपल्या भाषणातून विकासासाठी सर्वांनी एकत्र असावे असे आवाहन केले. ते म्हणाले की, नशिराबाद हे शहर हायवेला टच असून आता मोठ्या प्रमाणात विस्तारत आहे. यामुळे येथे वैद्यकीय सुविधा देखील वाढीव अशी लागणार असल्याने येथे भविष्यात उपजिल्हा रूग्णालय उभारण्यात येथील. येथील प्राथमिक आरोग्य केंद्राने कोरोना काळात केलेल्या कामगिरीचे पालकमंत्र्यांनी कौतुक केले. तर नशिराबादच्या विकासासाठी सर्वतोपरी मदतीची ग्वाही देखील दिली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सोनवणे यांनी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #GulabraoPatil

Related Posts

गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
जळगाव

बापरे! खेळण्यातील नोटा देऊन व्यापाऱ्याला 6 लाखात लुटले

February 4, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांकडून मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपींना अटक

February 4, 2026
अमळनेर

पाडळसरे धरणाच्या कुशीत विसवल्या स्वर्गीय अजितदादांच्या अस्थी

February 3, 2026
जळगाव

जीपीएस (GPS) मित्र परिवारातर्फे पाळधीत ५ फेब्रुवारीला भव्य ‘उद्योग-व्यवसाय मार्गदर्शन मेळावा

February 3, 2026
अमळनेर

पैसे पडल्याचे भासवून पैशांची पिशवी लांबवली !

February 3, 2026
Next Post

राष्ट्रवादीच्या 'या' आमदारांनी म्हटला पुष्पा स्टाईल डायलॉग 'मैं झुकेगा नही...!' (व्हिडीओ)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

काय सांगता ! फडणवीस आणि महाजनांच्या सांगण्यावरून गुलाबराव पाटील गेले गुवाहटीत !

June 23, 2022

Union Budget : ऑटो सेक्टरला मोठा दिलासा ; देशात गाड्यांचे रजिस्टर कुठूनही करता येणार !

February 1, 2022

माणसाला माणूस म्हणून जगण्याची ताकद बाबासाहेबांनी दिली : कैलास पवार !

April 24, 2023

धरणगाव बनावट मद्य छापा प्रकरण : मागील दोन वर्षापासून सुरु होता कारखाना !

January 23, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group