TheClearNews.Com
Friday, June 27, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

४६ वर्षीय प्रौढाची आत्महत्या ; व्हॉट्सऍप चॅटमधून बाहेर पडले धक्कादायक सत्य !

vijay waghmare by vijay waghmare
January 28, 2025
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) एका ४६ वर्षीय प्रौढ व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान, या प्रौढ व्यक्तीने आत्महत्या करण्यापूर्वी घरच्यांना मोबाईलवर सुसाईड नोट लिहिली आहे. या सुसाईड नोटमध्ये ९ जणांवर गंभीर आरोप करण्यात आले असून पैश्यांची मागणीही केली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात नोंद घेण्याचे काम सुरु आहे. दरम्यान, तीन जणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

जळगाव शहरातील जीवन नगरातील रहिवाशी असलेले अनिल हरी बडगुजर (वय-४६) रा. जीवननगर ह. मु. वाघनगर येथे एकटेच राहत होते. जि. प. डीआरडीओ विभागातील बचतगट विभागात अनिल बडगुजर हे कंत्राटी पध्दतीने मॅनेजर म्हणून कार्यरत होते. दरम्यान, दि. २६ जानेवारी (सोमवारी) रोजी रात्री ९.३० वाजता वाघ नगर येथील राहत्या घरात त्यांनी गळफास घेवून आत्महत्या केली. त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी घरच्यांना मोबाईलवर सुसाईड नोट पाठविली होती. अनिल बडगुजर यांचे वडील हरी बडगुजर आणि भाऊ अमित बडगुजर यांनी लागलीच धाव घेतली मात्र, तोपर्यन्त उशीर झाला होता.

READ ALSO

भरदिवसा घडलेला थरार… धरणगावात घरात घुसून ७३ वर्षीय वृद्धेवर कुऱ्हाडीने हल्ला, प्रकृती चिंताजनक !

जळगाव बसस्थानकात खिसे कापणाऱ्या अट्टल टोळीचा पर्दाफाश ; 5.51 लाखांचा मुद्देमाल जप्त

अनिल यांना गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्याच विभागातील बचत गटातील महिला व कर्मचारी हे विनयभंग आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत असल्याचे अनिल यांचे आईवडील, भाऊ आणि दोन बहिणींनी सांगितले. तसेच स्थानिक समितीत अनिल यांच्या विरोधात तक्रार केली होती. ही तक्रार मागे घेण्यासाठी महिला कर्मचारी यांनी ६ लाखांची मागणी केली होती. हि तक्रार मागे घेण्यासाठी ६ लाख रूपये या महिला कर्मचारी यांना दिले. पण तरी देखील तक्रार मागे घेण्यात आली नाही. आणि पुन्हा त्यांच्याकडे ६ लाखांची मागणी करण्यात आली. या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली असल्याचा आरोप आई लिला बडगुजर, बहिण स्वाती पचलोड यांनी केला आहे. यावेळी त्यांनी दोषींना अटक करण्यात यावी आणि आम्हाला न्याय देण्यात यावा अशी मागणी केली आहे.

प्राप्त झालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी आता पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे. मयताच्या पश्चात आई लिला, वडील हरी बडगुजर, भाऊ अमित आणि दोन बहिणी असा परिवार आहे.

काय आहे सुसाईड नोटमध्ये ?
आई आणा मला माफ करं या वयात मी तुम्हाला नाही ते दुःख देत आहे पण खरचं मी आता खूप थकलो आहे. जेव्हापासुन मला समजायला लागले तेव्हापासून प्रत्येक संकटाला मी सामोरे गेलो, आज नाही तर उद्याचा दिवस माझा राहिलं या आशेवर जगत आलो पण संकट माझा पिच्छा सोडायला तयार नाहीत, मला जगू वाटत होते. तुम्ही आहेत तो पर्यंत तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करायच्या होत्या. पण, मी किती बदनशिबी माझ्याच इच्छा मी पूर्ण करु शकलो नाही. काय पाप केले होते काय माहित पण मी सर्वांचे चांगले होईल ह्याचं विचाराने जगत आलो, तरी माझ्या वाट्याला असे दुःख यावे,असे संकट यावे, मी माझ्या स्वतच्या. बुध्दीवर आज पर्यंत प्रगती केली पण काही लोकांना माझी प्रगती पाहीली गेली नाही. स्वतः च्या स्वार्था साठी हरेश्र्वर भोई याने काही महिलांचा वापर केला मला एक वर्षापूर्वी सर्व समजले होते. पण, मी दुर्लक्ष करत होतों, माझ्या मरणास हरेश्र्वर भोई यास जबाबदार धरण्यात यावे.

राजु लोखंडे हे फक्तं पैश्यासाठी भोईचे ऐकत होते आणि माझे काही नुकसान केले, यांना फक्तं पैसा प्रिय आहे. पैश्यासाठी वाट्टेल ते करायला तयार असतात, भोई चे ऐकून शरद पाटील, संदिप खेडकर यांनी रुपाली पाटील, सुरेखा पाटील, कोमल जावळे, साधना देशमुख, सीमा पाटील यांनी माझी काही चूक नसताना खोट्या तक्रारी केल्यात, PD ना काही अधिकार नसतांना त्यांनी माझे वैयक्तिक बँक खातेचे तपशील सन 2020 पासून काढले पण त्यात त्यांना काहिच आढळून आले नाही, कारण मी आलेल्या मानधन आणि माझ्या इतर व्यवसायावर वर सर्व व्यवहार करत होतो, त्यामुळे माझ्या आत्महत्येस “हरेश्र्वर भोई, राजु लोखंडे, कोमल जावळे, सुरेखा पाटील, रुपाली पाटील, सीमा पाटील, साधना देशमुख, शरद पाटील, संदिप खेडकर यांना दोषी ठरवण्यात यावे व जो पर्यंत यांना अटक होत नाही तो पर्यंत माझ्या देहास अग्नी डाग देण्यात येऊं नये ही माझी शेवटची ईच्छा” असे नमूद केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaoncrime police

Related Posts

गुन्हे

भरदिवसा घडलेला थरार… धरणगावात घरात घुसून ७३ वर्षीय वृद्धेवर कुऱ्हाडीने हल्ला, प्रकृती चिंताजनक !

June 26, 2025
गुन्हे

जळगाव बसस्थानकात खिसे कापणाऱ्या अट्टल टोळीचा पर्दाफाश ; 5.51 लाखांचा मुद्देमाल जप्त

June 26, 2025
जळगाव

महाबळ रस्त्यावरील अतिक्रमण हटवले !

June 26, 2025
गुन्हे

बापरे ! सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून सेवानिवृत्त अधिकाऱ्याला गंडवले !

June 26, 2025
जळगाव

मुख्य अभियंत्याची धुळ्यातील औद्योगिक ग्राहक व महावितरण अधिकाऱ्यांसोबत बैठक संपन्न!

June 25, 2025
चाळीसगाव

चाळीसगाव येथे आणीबाणी अर्थात संविधान हत्या दिन निमित्ताने आणीबाणीत तुरुंगवास भोगणाऱ्या सेनानी व कुटुंबीयांचा आमदार मंगेश चव्हाण यांच्याहस्ते सत्कार…

June 25, 2025
Next Post

चोपडा महाविदयालयात “पौगंडावस्थेतील शिक्षण' या विषयावर विद्यापीठस्तरीय एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पुण्यात ‘या’ बँकेवर ईडीची छापेमारी; घोटाळा प्रकरणात NCP च्या आमदाराला अटक

January 16, 2021

गुन्हेगारांवर वचक बसावा यासाठी प्रत‍िबंधात्मक कारवाई आवश्यक : ज‍िल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार !

December 19, 2023

जमिनीला श्रीमंत करा, ती तुम्हाला श्रीमंत करीन – कृषिभूषण विश्वासराव पाटील

December 13, 2024

अमळनेर येथे सरदार पटेल यांची जयंती व इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी साजरी

October 31, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group