TheClearNews.Com
Friday, September 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मुलीची छेड काढल्याचा संशय ; जमावाच्या मारहाणीत प्रौढाचा मृत्यू !

असोद्यातील खळबळजनक घटना ; जळगाव तालुका पोलिसात ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल !

vijay waghmare by vijay waghmare
July 5, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) महिलेची छेड काढल्याच्या संशयावरुन जमावाकडून भास्कर दगडू भंगाळे (वय ४३, रा. असोदा, ता. जळगाव) यांना मारहाण करण्यात आली. या मारहाणीत भंगाळे यांना गंभीर दुखापत होवून त्यांचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवार दि. ४ जुलै रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास असोदा गावातील एका परिसरात घडली. याप्रकरणी मयताविरुद्ध विनयभंगाचा तर मारहाण करणाऱ्यांविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव तालुक्यातील असोदा गावात भास्कर भंगाळे हे कुटुंबियांसह वास्तव्यास होते. असोदा गावालगत त्यांची शेतजमिन असल्याने शेतीकरुन ते कुटुंबाचा उदनिार्वाह करीत होते. शेतात कामासाठी लागणारे मजूर आणण्यासाठी भंगाळे हे गुरुवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास गावातील एका परिसरात गेले होते. याठिकाणी त्यांनी महिलेची छेड काढल्याच्या संशयावरुन परिसरातील नागरिकांनी त्यांना जाब विचारला. त्यानंतर काही जणांनी थेट भंगाळे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. जमावाकडून बेदम मारहाण झाल्यामुळे भास्कर भंगाळे हे गंभीर जखमी झाले आणि त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.

READ ALSO

मसाज सेंटरच्या नावाखाली देहविक्री करणाऱ्यांचा पर्दाफाश

अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून केला अत्याचार

ग्रामस्थांनी केले जिल्हा रुग्णालयात दाखल !
जमावाकडून झालेल्या मारहाणीत भास्कर भंगाळे यांच्या चेहऱ्यावर दुखापत होवून त्यांचा चेहरा सुजलेला होता. दरम्यान, या मारहाणीत ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना गावातील काही जणांनी तात्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विन देवचे यांनी तपासणी करीत मयत घोषीत केले.

शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर होणार मृत्यूचे नेमकं कारण स्पष्ट !
जमावाकडून मारहाण झाल्यामुळे मयत भास्कर भंगाळे यांच्या अंगावर कुठेही मारहाणीच्या खूणा दिसत नव्हता. त्यामुळे त्यांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला याबाबत पोलिसांकडून देखील अधिक चौकशी केली जात होती. मयताचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर त्यांचा मृत्यूचे कारण स्पष्ट झाल्यानंतर गुन्ह्याचा उलगडा होणार असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली.

नातेवाईकांसह ग्रामस्थांची जिल्हा रुग्णालयात धाव !
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांसह भंगाळे यांच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली होती. त्यानंतर सायंकाळी शोकाकुल वातावरणात भंगाळे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. मयत भंगाळे यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा व भाऊ असा परिवार आहे.

मयताविरुद्ध विनयभंगाचा तर सात जणांविरुद्ध खूनाचा गुन्हा
पिडीत महिला घरात एकटीच असल्याचा फायदा घेत मयत भास्कर भंगाळे यांनी पिडीतेचा हात पकडून विनयभंग केल्याप्रकरणी मयताविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलीस पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरुन मारहाण करणाऱ्या महिलांसह पुरुष असे एकूण सात जणांविरुद्ध तालुका पोलीसात रात्री उशिरापर्यंत खूनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

मजूरांना अॅडव्हान्स देण्यासाठी भावाकडे केली होती पैशांची मागणी !
मयत भास्कर भंगाळे यांनी शेतात काम करणाऱ्या मजूरांना अॅडव्हान्स देण्यासाठी त्यांचे लहान भाऊ लिलाधर भंगाळे यांना पैशांसाठी फोन केला. मात्र ते बाहेरगावी जात असल्याने त्यांनी मी घरी आल्यानंतर पैसे देतो असे त्यांना सांगितले. त्यानंतर अवघ्या काही वेळताच आपल्या भावाचा मारहाणीत मृत्यू झाल्याचे कळताच लिलाधर भंगाळे हे जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. यावेळी भावाचा मृतदेह बघताच त्यांनी रुग्णालयात एकच आक्रोश केला.

मारहाण करणाऱ्या महिलांसह पुरुषांना घेतले चौकशीसाठी ताब्यात !
घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांच्यासह तालुका पोलीस ठाण्यातील कर्मचारी प्रदीप राजपुत, सुधाकर शिंदे, विलास शिंदे, प्रवीण पाटील, चेतन पाटील, ज्ञानेश्वर कोळी यांच्यासह गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर सायंकाळी उशिरापर्यंत त्यांनी मारहाण करणाऱ्या महिला व पुरुषांना ताब्यात घेवून त्यांची चौकशी केली जात होती

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonSuspicion of molesting a girl; Death of an adult in mob beating!

Related Posts

गुन्हे

मसाज सेंटरच्या नावाखाली देहविक्री करणाऱ्यांचा पर्दाफाश

September 3, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून केला अत्याचार

September 3, 2026
गुन्हे

पिंप्राळ्यात घरात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर तिसऱ्यांदा छापा

September 2, 2026
गुन्हे

कारखान्यांमध्ये ४७ लाखांची वीजचोरी; दोन प्रकरणांत तिघांवर गुन्हा दाखल

September 1, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरमध्ये छेडछाड; आणखी ५ ग्राहकांवर गुन्हे

September 1, 2026
गुन्हे

महिलेच्या घरातून लाखो रुपयांचा ऐवज लांबविणारे दोघे चोरटे भावंड गजाआड

September 1, 2026
Next Post

चोपडा तालुक्यातील शेतकऱ्याला पावणेतीन लाखांत ऑनलाईन गंडवले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खासदार उदयनराजे कोरोना पॉझिटिव्ह ; चार दिवसापासून रुग्णालयात !

August 18, 2021

अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करून लैंगिक शोषण ; १५ हजार रुपयेही उकळले !

February 20, 2022

Today Horoscope : आजचे राशीभविष्य ३१ ऑगस्ट २०२३ !

August 31, 2023

मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी; पाच न्यामूर्तींच्या खंडपीठाची स्थापना, 9 डिसेंबरला सुनावणी

December 5, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group