जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात प्रथमच जळगावातील सर्व कलाप्रकारातील कलावंतांना सोबत घेऊन एक सुंदर अशी कलाकृती म्हणजे दिवंगत पार्श्वगायक यांना श्रध्दांजलीपर ‘स्वरांजली’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम जळगाव जिल्हा आर्टीस्ट असोसिएशन मार्फत ३१ जुलै २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजता छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात होणार आहे.
दिवंगत पार्श्वगायक मोहम्मद रफी, लता मंगेशकर, किशोरकुमार, मुकेश, मन्नाडे, बप्पी लहेरी, के.के., भुपेंद्र, मोहम्मद अजीज, एस.पी. बालसुब्रमण्यम् आदि यांनी गायलेल्या गाण्यांना उजाळा देत भावपूर्ण स्वरांजली आयोजित करण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे जळगाव जिल्ह्यातील संगितमय इतिहासात प्रथमच एकाच मंचावर तब्बल २० संगितकार एकाच वेळी आपली कला सादर करणार आहेत. तसेच महिला व पुरूष गायक जवळपास १२ गायक स्वरांजली अपर्ण करणार आहेत. सदर कार्यक्रम हा सर्व रसिकांसाठी खुला व विनामूल्य आयोजित केला असून मोफत प्रवेश पत्रिका प्राप्त करण्यासाठी गोलाणी मार्केट समोरील मायटी ब्रदर्स यांचे कार्यालयात पासेस उपलब्ध आहे. तरी या आगळ्या-वेगळ्या संगीतमय कार्यक्रमाचा जिल्ह्यातील सर्व रसिकांनी या आनंद घ्यावा, असे आवाहन जळगाव जिल्हा आर्टीस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सलमान शाह व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.