TheClearNews.Com
Thursday, August 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

प्रतिभावंत युवक हे राष्ट्राची संपत्ती : ना. गुलाबराव पाटील !

जिद्द व धाडसाने जगाच्या पाठीवर कुठेही जाण्याची तयारी ठेवा : ना. गिरीश महाजन !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 22, 2023
in जळगाव, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

सीसीटीव्ही, गोपनीय माहितीच्या आधारे मध्यप्रदेशातील आरोपी ताब्यात

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

जळगाव (प्रतिनिधी) तरूण पिढीने जिद्द, धाडस ही वृत्ती अंगी बाळगून स्वत:वर विश्वास ठेवत जगाच्या पाठीवर कोठेही जाण्याची तयारी ठेवावी. निश्चितच यश प्राप्त होईल तर असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केले. तर विद्यापीठात जिल्हा नियोजन व विकास समितीच्या माध्यमातून बहिणाबाई चौधरी यांचा पुतळा उभारण्यासाठी एक कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जी-२० च्या निमित्ताने तरूणांना मोठे दालन उपलब्ध झाले आहे. ग्रामिण आणि शहरी हा न्यूनगंड न बाळगता काम करा. भारत हा जगातील सर्वात अधिक तरूणांचा देश आहे. तरूणाईवरच देशाच्या प्रगतीचा मोठा भार असून ते विकासाचे आधारस्तंभ आहेत. तरूणांनी शिस्तबध्द असण्याची मोठी गरज असून युवकांनी शिस्तीचे पालन करावे. युवक हे देशाचे भवितव्य असून प्रतिभावंत युवक हे राष्ट्राची संपत्ती असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात युवक व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार, उच्च व तंत्रशिक्षण विभाग महाराष्ट्र शासन आणि विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्यावतीने शनिवार दि. २२ जुलै रोजी ॠ-२० युवा संवाद- भारत २०४७ या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांचे उदघाटन करतांना ना.गिरीष महाजन व ना.गुलाबराव पाटील बोलत होते. कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात युवक व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार, उच्च व तंत्रशिक्षण विभाग महाराष्ट्र शासन आणि विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्यावतीने शनिवार दि. २२ जुलै रोजी G-20 युवा संवाद- भारत @2047 या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. या कार्यक्रमाला ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन आणि पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्यासह खा. रक्षा खडसे, आ. मंगेश चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी रा.से.यो. राज्य सल्लागार राजेश पांडे, प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे, व्य. प. सदस्य राजेंद्र नन्नवरे, जळगाव जिल्हा सहकारी दुध संघाचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश मोरखाडे यांची मंचावर विशेष उपस्थिती होती. मान्यवरांची उपस्थिती होती.
याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, G-20 च्या निमित्ताने तरूणांना मोठे दालन उपलब्ध झाले आहे. जगाला भारताची गरज आहे. ग्रामिण आणि शहरी हा न्यूनगंड न बाळगता काम करा. मी स्वतः ग्रामीण भागातील आहे. तरूणांनी सोशल मिडीयाच्या आहारी जाऊ नये , वैयक्तिक आयुष्यात आणि सामुहिक पातळीवर शिस्तबध्द जगा असे आवाहन तरूणांना करतांना आम्हा राजकारणांचा जॉब फार कठीण आहे. दिवसभरात वेगवेगळ्या भूमिका कराव्या लागतात असे ते म्हणाले. विद्यापीठात जिल्हा नियोजन व विकास समितीच्या माध्यमातून बहिणाबाई चौधरी यांचा पुतळा उभारण्यासाठी एक कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
भारत हा जगातील सर्वात अधिक तरूणांचा देश आहे. तरूणाईवरच देशाच्या प्रगतीचा मोठा भार असून ते विकासाचे आधारस्तंभ आहेत. सोशल मीडियाचा वापर हा सारासारविवेक बुध्दीने आणि माफक प्रमाणात करावा. अन्यथा, सोशल मीडिया हा आयुष्याची राखरांगोळी केल्याशिवाय राहणार नाही. पोलीस आणि सैन्यदलात सर्वाधीक तरूण हे ग्रामीण भागातीलच आहे. यामुळे आपण ग्रामीण भागातील असल्याचा मुळीच न्यूनगंड बाळगू नका. तरूणांनी शिस्तबध्द असण्याची मोठी गरज असून युवकांनी शिस्तीचे पालन करावे. युवक हे देशाचे भवितव्य असून प्रतिभावंत युवक हे राष्ट्राची संपत्ती असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. गुलाबराव पाटील यांनी यावेळी शेर पेश केला. मंजिल उन्हीं को मिलती है, जिनके सपनों में जान होती है, पंख से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है !
तर ना. गिरीश महाजन म्हणाले की, तरूण पिढीने जिद्द, धाडस ही वृत्ती अंगी बाळगून स्वत:वर विश्वास ठेवत जगाच्या पाठीवर कोठेही जाण्याची तयारी ठेवावी. निश्चितच यश प्राप्त होईल. यावेळी गिरीश महाजन म्हणाले की, राष्ट्रप्रेम हा शब्द जबाबदारीची जाणिव करून देणारा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाच्या विकासाचे स्वप्न बदलण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत. यासाठी विविध योजना शासनाकडून राबविल्या जात असून शेवटच्या माणसालाही मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. G-20 च्या निमित्ताने जगात भारताची मान उंचावली असून या संमेलनात सहभागी होणाऱ्या तरूणांनी स्वत:वर विश्वास ठेवण्याची गरज आहे. धाडस अंगी बाळगा, प्रामाणिकपणे काम करा, इतरांशी स्पर्धा करतांना आपली रेष मोठी करा, जिद्द ठेवा, व्यसनापासून अलिप्त रहा आणि जगात कुठेही जाण्याची तयारी ठेवा यश निश्चित मिळेल.
खा. रक्षाताई खडसे यांनी देशाच्या विेकासात तरूणांचा सहभाग फार महत्वाचा असल्याचे सांगून देशापुढील येणाऱ्या आव्हानांची चर्चा G-20 अंतर्गत होत आहे ती समजून घ्या असे आवाहन केले. आ. मंगेश चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना काळानुरूप स्वत:मध्ये बदल करा. येणाऱ्या अडचणींवर मात करा आणि विजयाचे शिल्पकार स्वत: व्हा असे आवाहन केले.
बीजभाषणात रा.से.यो.चे राज्य सल्लागार राजेश पांडे यांनी या संमेलनाविषयी सविस्तर भूमिका मांडली. पुढच्या १२ दिवसात राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये १५०० विद्यार्थ्यांचे हे संमेलन होणार आहे. असे एकूण २८ हजार विद्यार्थी या संमेलनातून तयार होतील आणि ते पुढे ते शंभर रा.से.यो. कार्यकर्त्यांना प्रत्येक महाविद्यालयात तयार करतील ९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत प्रत्येक महाविद्यालयातील हे शंभर विद्यार्थी प्रत्येकी वीस विद्यार्थ्यांना भेटून पंचप्रण, रोजगार निर्मिती व इतर प्रश्नांविषयी सांगतील असे एकूण ४० लाख विद्यार्थ्यांपर्यंत हे पंचप्रण पोहचवण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांनी जीवनात शिस्त, उत्तम संगत आणि प्रामाणिकपणाची सवय अंगीकारण्याचा सल्ला उपस्थित तरूणांना दिला. अभिमान आणि अहंकार यातील फरक ओळखून सृजणात्मकतेकडे वळावे अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रास्ताविकात संमेलनाचे कार्याध्यक्ष तथा व्य.प.सदस्य राजेंद्र नन्नवरे यांनी देशात या प्रकारचे पहिले संमेलन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात होत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे बहारदार सूत्र संचलन प्रा. आर.आर. राजपूत यांनी केले. कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी आभार मानले. उद्घाटनापुर्वी विद्यार्थी भवनापासून पदवी प्रदान सभागृहापर्यंत तिरंगा यात्रा काढण्यात आली. पालकमंत्री गुलाबराव पाटील व ग्रामविकास मंत्री गिरुष महाजन यांच्या हस्ते फुगे आकाशात सोडून या तिरंगा यात्रेचे उद्घाटन करण्यात आले.
यांची होती उपस्थिती !
यावेळी व्यासपीठावर व्य.प. सदस्य प्रा.शिवाजी पाटील, सुरेखा पालवे, समन्वयक अॅङ अमोल पाटील, नितीन झाल्टे, डॉ. पवित्रा पाटील, सह संचालक डॉ. सतोष चव्हाण, सीए रवींद्र पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा. योगेश पाटील, अधिसभा सदस्य विष्णू भंगाळे, रा.से.यो. संचालक डॉ. सचीन नांद्रे, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. जे.डी. लेकुरवाळे हे उपस्थित होते. या कार्यक्रमास अधिसभा सदस्य, विद्यापरिषद सदस्य, प्राचार्य उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

एरंडोल

सीसीटीव्ही, गोपनीय माहितीच्या आधारे मध्यप्रदेशातील आरोपी ताब्यात

August 12, 2026
गुन्हे

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

August 12, 2026
अमळनेर

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

August 12, 2026
गुन्हे

भरदिवसात धांडे नगरातील मंदिरात अल्पवयीन चोरट्यांचा डल्ला

August 11, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी आणखी दोन जणांवर गुन्हे दाखल

August 11, 2026
जळगाव

भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास

August 10, 2026
Next Post

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागांनी सतर्क रहावे : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राज्यातील अनुकंपा धारकांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याबद्दल व्यक्त केली कृतज्ञता !

August 24, 2024

तरुणीच्या मोबाईलमधून खासगी व्हिडीओ व्हारल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

May 21, 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हातात हुकमाची पानं : संजय राऊत

May 29, 2021

बीडमध्ये भाजपला हादरे सुरूच, प्रीतम मुंडेंना डावल्यामुळे ११ तालुकाध्यक्षांचा राजीनामा

July 10, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group