जळगाव (प्रतिनिधी) शिक्षक पात्रता परीक्षेतील घोटाळ्यात जळगाव जिल्ह्यातील ६१४ शिक्षक गैरमार्गाने परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. या सर्व शिक्षकांना त्वरित सेवेतून कमी करण्याची मागणी राष्ट्रवादीचे रावेर लोकसभा विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष गौरव वाणी यांनी शिक्षक अधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
गौरव वाणी यांनी या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव जिल्ह्यातील गैरमार्गाने परीक्षेत परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या ६१४ शिक्षकांची नाव व आस्थापने सहित यादी मिळावी. तसेच आपण गैर मार्गाने परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांवर काय कारवाई केली?, याची माहिती मिळावी अशी मागणी देखील गौरव वाणी यांनी निवेदनात केली आहे.
गैरमार्गाने पात्रता नसताना बोगस रित्या पास झालेले सदरचे शिक्षक आजही शाळांवर आस्थापनेचे काम करीत असून सदरची बाब गंभीर आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे. त्यामुळे गैरमार्गाने उत्तीर्ण झालेले या ६१४ बोगस शिक्षकांना तात्काळ सेवेतून कमी करून विद्याथ्र्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान थांबविण्यात यावे,असेही निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर रोहन गणेश सोनवणे, गौरव हरीपाल वाणी, चंदन कोळी, अक्षय बारी, गणेश निंबाळकर, रुपेश सूर्यवंशी यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.