एरंडोल (प्रतिनिधी) एरंडोल ते भडगाव रस्त्यावर अज्ञात चारचाकी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
यासंदर्भात अधिक असे की, एरंडोल ते भडगाव रस्त्यावर अज्ञात चारचाकी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. रात्री साधारणपणे साडेनऊ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातामध्ये दुचाकीवर असणारे तिघे जागीच ठार झाले. यात बलदीप सुकटा पवार (वय ३२), बबलू बच्चन भोसले (वय २२) आणि गोटू पिंटू चव्हाण (वय १२) या तिघांचा समावेश आहे. या अपघाताची माहिती मिळताच परिसरातून ग्रामस्थांनी अपघातस्थळी धाव घेतली. तर संबंधीत कार चालकाने घटनास्थळावरून पळ काढला असून त्याचा शोध सुरू करण्यात आला आहे. या अपघातातील मृतदेह शव विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आलेले आहेत.