धरणगाव (प्रतिनिधी) मासे विक्री करणाऱ्या दुकानावर दहशत माजवून एका तरुणाला मारून जखमी केल्याची घटना धरणगाव तालुक्यातील प्रिंपी खु. येथे घडली. याप्रकरणी धरणगाव पोलीस स्थानकात आरोपी सुधाकर उर्फ गुड्डु रघुनाथ गायकवाड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, धरणगाव येथील प्रिंपी खु. येथे तोहित युसुफ खाटीक (वय २४) हे वास्तव्यात असून गावातील ग्रामपंचायत कार्यालयाच्या बाजूला मासे विक्रीचा व्यवसाय करतात. या गावातीलच सुधाकर उर्फ गुड्डु रघुनाथ गायकवाड याने दिनांक 28 फेब्रुवारी 2025 रोजी तोहित यांच्या दुकानावर येऊन हातात लोखंडी कोयता घेऊन पैसे दिले नाही तर मारून टाकेल असे धमकावले. तसेच पैशांची मागणी करू लागला. यावेळी तोहित याने नकार दिल्यावर सुधाकर यांनी शिवीगाळ केली. यावेळी तोहित यांचे मित्र अभिषेक कैलास चौधरी व तबरेज कुरेशी हे त्यास आवरण्यास गेले असता त्यांना सुध्दा शिवीगाळ करुन मारहाण केली. अभिषेक कैलास चौधरी हा जखमी झाला आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस स्थानकात सुधाकर उर्फ गुड्डु रघुनाथ गायकवाड त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.