धरणगाव प्रतिनिधी । येथील शतकोत्तरी पी. आर.हायस्कूल मध्ये ‘थँक्स टू टिचर ‘अभियाना अंतर्गत विविध उपक्रम घेण्यात आले. आज या अभियानाची सांगता गुगल मीट अॅप्सवर ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा घेऊन करण्यात आली.
कोरोना काळात शाळा बंद आणि विद्यार्थी घरी असल्याने पी.आर.हायस्कूलने शिक्षक दिनापासून शिक्षकांच्या सन्मानार्थ थँक्स टू टिचर हे अभियान राबविले. या अभियानाची सांगता गुगल मीट वर ऑनलाईन विद्यार्थ्यांच्या ‘माझे आवडते शिक्षक ‘या विषयावरील वक्तृत्व स्पर्धेने झाली. अध्यक्षस्थानी उपमुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे हे होते तर अतिथी म्हणून मुख्याध्यापक एस.एम.अमृतकर आणि पर्यवेक्षक आर. के. सपकाळे यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. वैशाली गालापुरे यांनी केले. यावेळी पन्नास विद्यार्थ्यांनी आवडत्या शिक्षकाबद्दल मनोगत व्यक्त केले. यात प्रथम क्रमांक ओम अविनाश पाटील, द्वितीय- भूमिका गणेशसिंह सूर्यवंशी, तृतीय -आदित्य राजपुत आणि उत्तेजनार्थ -वैशाली संजय रावतोळे, पलक नरेंद्र कुमट, निरल चव्हाण यांनी बक्षिसे मिळवलीत. परीक्षक म्हणून सौ. आशा शिरसाठ व चंद्रकांत शिरसाठ यांनी काम पाहिले. विभाग प्रमुख गणेशसिंह सूर्यवंशी यांनी आभार मानले. पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी गुगल मीट वरील या आगळ्यावेगळ्या ऑनलाईन अभियानाचे कौतुक केले. डॉ. संजीवकुमार सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून या अभियानाची सांगता केली.