जळगाव (प्रतिनिधी) बंदोबस्तासाठी आलेला पोलिस गणेशावरच दारु पिवून तर्रर्रर्र झाला होता. त्याने एका कर्मचाऱ्यासोबत वाद घालून हॉटेलबाहेर धिंगाणा घातल्याची घटना रविवारी सायंकाळी भास्करमार्केट परिसरातील एका हॉटेलसमोर घडली होती. दरम्यान, पोलीस अधीक्षकांनी या घटनेची दखल घेतली असून मुक्ताईनगर पोलिस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल संदीप धनगर यांना निलंबित केल्याचे आदेश काढले असून या प्रकरणात संबंधिताची प्राथमिक चौकशी करण्यात येणार असून निलंबन काळात धनगर यांना मुख्यालयात रहावे लागणार आहे.
शहरात बंदोबस्तासाठी संपुर्ण जिल्ह्यातून पोलिसांचा बंदोबस्त मागविण्यात आला होता. बाहेरगावाहून आलेल्या कर्मचाऱ्यांना कार्यक्रम आटोपल्यानंतर सोडून देण्यात आले होते. दरम्यान, मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी हे बंदोबस्त आटोपल्यानंतर भास्कर मार्केट परिसरातील एका हॉटेलमध्ये आले. गणवेशावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी त्याठिकाणी दारू रिचवली त्यानंतर कर्मचाऱ्यांमध्ये वाद होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर ते हॉटेलबाहेर आल्यानंतर त्यांच्या पुन्हा वाद होवून हाणामारी झाली.
यामध्ये एक कर्मचाऱ्याला दोन कर्मचारी त्या कर्मचाऱ्याला आवरत असतांना एक जण शेजारी असलेल्या चिखलाच्या डबक्यात पडला होता, त्यानंतर कार काढताना दोन दुचाकींना धक्का देत त्या पाडल्या व काही अंतरावर जाऊन एका सायकलस्वार मुलाला घडक देत पसार झाल्याची घटना घडली होती. कर्मचाऱ्याला समजविण्यासाठी गेले दोघे हॉटेलमध्ये गोंधळ घालणाऱ्या पोलीस कर्मचारी संदीप धनगर हे मद्यपान केल्यानंतर वाद घालत असल्याची माहिती मिळताच, त्याच्यासोबत असलेले दोघे त्याला समजविण्यासाठी गेले होते. त्याला समजवित असतांना एकाचा तोल जावून तो शेजारच्या डबक्यात कोसळल्याची माहिती मिळाली. मात्र गणवेशातच मद्यपान केल्याचा ठपका ठेवून संदीप धनगर यांच्यावर निलंबणाची कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षकांनी घेतली दखल !
या संर्पण घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी या घटनेची दखल घेत त्याचा अहवाल संबंधीत पोलीस ठाण्याच्याकडून मागविला होता. दरम्यान, ते गोंधळ घालणारे कर्मचारी हे मुक्ताईनगर पोलिस ठाण्यातील असल्याचे समोर आले असून त्या विषयी अहवाल पोलिस अधीक्षकांना प्राप्त झाला होता.
निलंबन काळात मुख्यालयात रहावे लागणार उपस्थित !
मुक्ताई नगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी संदीप धनगर यांचे निलंबनाचे आदेश काढले असून त्यांची प्राथमिक चौकशी केली जाणार आहे. तसेच निलंबण काळात त्यांना पोलीस मुख्यालयात हजर रहावे लागणार आहे. दरम्यान, या प्रकरणी कोणाची तक्रार नसल्याने गुन्हा दाखल झाला नसल्याचेही पोलिस अधीक्षक डॉ. रेडी यांनी सांगितले.