जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात कालपासून पावसाचे दमदार आगमन झाले असून मंगळवारी (१७ ऑगस्ट) जिल्ह्यात ५० मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून काल सर्वाधिक ८०.७ मिमी पाऊस पारोळा तालुक्यात झाला असून सर्वात कमी पाऊस २८.८ मिमी पाऊस मुक्ताईनगर तालुक्यात झाल्याचे कृषि विभागाने प्रसिध्दीस दिलेल्या अहवालात म्हटले आहे.
कृषि आयुक्तालयाच्या सुधारित नियमावलीनुसार जळगाव जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७१९.७ मिलीमीटर इतके आहे. ऑगस्ट महिन्याचे सरासरी पर्जन्यमान हे १९६.१ मिलीमीटर इतके असून आजपर्यंत जिल्ह्यात ६७.९ मिलीमीटर म्हणजेच ऑगस्ट महिन्याच्या सरासरीच्या ३४.६ टक्के इतका पाऊस पडला आहे.
जिल्ह्यासाठी जून महिन्याचे सरासरी पर्जन्यमान १२३.७ मिलीमीटर, जुलै १८९.२ मिलीमीटर, ऑगस्ट १९६.१ मिलीमीटर तर सप्टेंबर महिन्याचे सरासरी पर्जन्यमान हे १२३.६ मिलीमीटर असे संपूर्ण पावसाळा कालावधीचे सरासरी पर्जन्यमान हे ६३२.६ मिलीमीटर असल्याचे कृषि विभागाने कळविले आहे.
त्यानुसार जिल्ह्यात तालुकानिहाय जूनपासून आजपर्यंत (१८ ऑगस्ट, २०२१) पर्यंत पडलेला पाऊस मिलीमीटरमध्ये कंसात (जून ते आजपर्यंतच्या सरासरीशी टक्केवारी) जळगाव तालुका- ३१५.३ मिलीमीटर (६६.१ टक्के), भुसावळ- २९२.२ मि.मी. (६९.६), यावल- २९२ मि.मी. (६५.५), रावेर- ३२४.६ मि.मी. (७६), मुक्ताईनगर- २४७.२ मि.मी. (६५), अमळनेर- २६२.२ मि.मी. (६५.३), चोपडा- २३३.४ मि.मी. (५०.७ टक्के), एरंडोल- ४०६ मि.मी. (९६.१), पारोळा- ४७३.९ मि.मी. (११३.७३), चाळीसगाव- ४२७.७ मि.मी. (१०९.१), जामनेर- ३६६.९ मि.मी., (७८.७), पाचोरा- ३६४.३ मि.मी. (८६.८), भडगाव- ३५५.७ मि.मी. (८४.८) धरणगाव-३८८.८ मि.मी. (७३.४), बोदवड-३१८.६ मि.मी. (७३) याप्रमाणे जिल्ह्यात ऑगस्टपर्यतच्या सरासरीच्या एकूण ३३३.४ मि.मी. म्हणजेच ७८.१ टक्के इतका पाऊस पडल्याचे कृषि विभागाच्या पत्रकात म्हटले आहे.
















