धरणगाव (प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी अँड.संजय महाजन यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
अँड.संजय महाजन यांची आतापर्यंतची राजकीय कारकीर्द पहाता त्यांनी पक्षाची बाजू मांडतांना विरोधकांना कडाडून विरोध केला आहे. कार्यकर्त्यांच्या पोलीस स्टेशन,दवाखाना,तहसील,पंचायत समिती,एम.एस.ई.बी इत्यादी ठिकाणावरील अडीअडचणी सोडविल्या. त्यामुळेच भारतीय जनता पार्टीकडून त्यांना तालुकाध्यक्ष पद देण्यात आले होते.
तालुकाध्यक्ष पदाची नवी जबाबदारी सुरुवात केल्या नंतर त्यांनी अडल्या-नडल्याचे काम सुरू केले. गोरगरीब व सुज्ञ जनतेला न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. अवघ्या काही मतांनी पालिका निवडणुकीत पराभूत झाल्यानंतरही दुसऱ्या दिवसापासून त्यांनी समाज सेवा सुरूच ठेवली. त्यानंतर त्यांची भाजप ओबीसी आघाडीच्या जिल्हाअध्यक्ष म्हणून निवड झाली आणि जिल्ह्यात भाजपचा बहुजन चेहरा म्हणून त्यांच्याकडे बघितले जाऊ लागले.
साध्या नूतन सोसायटीच्या निवडणुकी वेळी त्यांच्या आईचे दु:खद निधनाला अवघे दहा दिवस सुध्दा झाले नव्हते. परंतु निवडणूक निकालावेळी कार्यकर्त्यांना त्यांची आवश्यकता भासत आहे, असे त्यांना समजताच ते कोण काय म्हणेल याची पर्वा नकरता त्याठिकाणी थांबले. दरम्यान, आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर भाजपने अँड.संजय महाजन यांच्या निमित्ताने आश्वासक ओबीसी चेहरा दिल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.