धरणगाव (प्रतिनिधी) शहरासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती महाअभियान अंतर्गत शहरात वितरण वाहिनीचे काम प्रगतीपथावर आहे. या योजनेच्या पहिल्या टप्यात जल कुंभावरून नवीन वितरण वाहिनीतून अंदाजे २ हजार ९ जोडण्यांद्वारे पाणीपुरवठा करणार आहे.
शहरातील परिहार चौक, बेलदार मोहल्ला, बि. डी. पवार चौक, मेन रोड, कोर्ट बाजार, भावे गल्ली भाटिया गल्ली, लांडगे गल्ली, गुजराथी गल्ली मलाकली, अग्निहोत्री गल्ली, कासार गल्ली, परिहार नगर, नेहरू नगर, मेन रोड, अर्बन बँक रस्ता, नवेगाव, तेली तलाव परिसर, लहान माळीवाडा, पोलिस लाइन, संजय नगर, सोनवद रस्ता, घनकचरा या भागापर्यंत एकाच वेळी ६ जून रोजी नवीन पाइपलाइनद्वारे पाणी सोडले जाणार आहे. सद्य:स्थितीत नवीन वाहिनीची चाचणी सुरू आहे. नवीन पाइपलाइनचे पाणी नगर परिषदेने सुचित केल्याशिवाय पिण्यासाठी वापरु नये, असे आवाहन मुख्याधिकारी यांच्यातर्फे करण्यात आले आहे.