शिरपूर (प्रतिनिधी) तालुक्यातील कुरखळी येथील महादेव मंदिरात परिवारासह दर्शनासाठी आलेल्या अडावद (ता. चोपडा) येथील २१ वर्षीय तरुणाचा तापी नदी पात्रात पाय घसरून मृत्यू झाला. सुकदेव मंगेश खजरे असे मयत तरुणाचे नाव आहे.
सुकदेव मंगेश खजरे हा युवक परिवारासह १२ जून रोजी दर्शनासाठी आला होता. सकाळी ९ वाजेच्या सुमारास तापी काठावर तो पाय धूत असताना अचानक त्याचा पाय घसरून पाण्यात बुडाला. त्याचक्षणी त्याच्या आप्त जणांनी आरडाओरड केल्यामुळे जवळील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. पट्टीचे पोहणाऱ्यांनी लागलीच त्याला बाहेर काढून उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याबाबत थाळनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.