TheClearNews.Com
Tuesday, August 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

संगीताची भाषा ही जगातील सर्वोत्तम सुलभ भाषा : प्रा.बी.एन.चौधरी !

धरणगावात स्व.लक्ष्मीचंदजी डेडिया स्मरणार्थ संगीत महोत्सव संपन्न !

vijay waghmare by vijay waghmare
August 11, 2024
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) संगीताची भाषा ही जगातील सर्वोत्तम सुलभ भाषा आहे. ती जात, धर्म, प्रदेशाची सीमा ओलांडते. माणसामाणसात प्रेम निर्माण करते. संगीत मनातील ताणतणाव दूर करुन मनस्वास्थ्य प्रदान करते, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध साहित्यिक, व्यंगचित्रकार प्रा.बी.एन.चौधरी यांनी केले. प्रत्येक माणसाने आपली उपजीविका सांभाळून एखादी कला जीवनी म्हणून जोपासावी असे आवाहन त्यांनी केले. ते येथील स्व.श्री.लक्ष्मीचंदजी डेडिया (मास्टरजी) यांच्या स्मरणार्थ त्यांचा शिष परिवार आणि श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट यांच्यावतीने आयोजित स्वरांजली कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरुन बोलत होते.

स्व. लक्ष्मीचंदजी डेडीया दुसऱ्या स्मृती-संगीत महोत्सवाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले.त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.बी.एन.चौधरी सर यांचा सत्कार श्री आ.दि.जैन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राहुल जैन यांनी केले. कार्यक्रमात खान्देशातील प्रसिद्ध बासरी वादक योगेश पाटील यांच्या बासरी वादनानंतर आर.बी.पाटील, दुष्यंन्त जोशी, मोहन रावतोळे यांनी शास्त्रीय गायन,भैरवी,एकल गायन केले. सचिन जगताप आणि चि.स्वरा जगताप यांचे सोलो तबला वादन उत्स्फूर्त दाद घेवून गेले. राजेश डहाळे,प्रदीप झुंझारराव, नाना पवार, तनय डहाळे, राजेश मकवाने, दीपक चौधरी, किरण महाजन, चि.पूर्वा पाटील, चि.निशांत पाटील, सौ.शोभा सूर्यवंशी, सौ.स्वाती भावे, सौ.भारती तिवारी, कु.श्रेया भावे, संजय परदेशी, पियुष डहाळे यांनी आपले भजन, भक्तीगीत, सादरीकरण केले. सभागृहाबाहेर रिमझीम पाऊस कोसळत असतांना सभागृहात सूर-संगीताच्या सरीत रसिक श्रोते चिंब भिजत होते. अंत्यत शिस्तबद्ध आणि देखण्या कार्यक्रमाने उपस्थितांची मने मने जिंकून घेतली. शहरात या कार्यक्रमाच्या निमित्ताने गीत-संगीत कलावंतांसाठी एक नवे व्यासपीठ उभे रहात आहे.

READ ALSO

मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात

माणूस केंद्रस्थानी असलेले साहित्यच चिरंतन – कवि किरण येले

संगीत क्षेत्रात गुरु परंपरेला खूप महत्व आहे. आपल्या गुरुंप्रती त्यांच्या शिष्यानी दाखवलेल्या आदरातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला डी. जी. पाटील, डॉ. मिलिंद डहाळे, प्रा. ए. आर. पाटील, गणेश रावतोळे, भानुदास विसावे,संजय महाजन,आबा वाघ,लक्ष्मण पाटील,विजय शुक्ला यांसह शहरातील शैक्षणिक, सामाजिक,राजकीय क्षेत्रातील रसिक मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचलन अभिजित पाटील यांनी तर आभार प्रदर्शन प्रतीक जैन यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राहुल जैन, श्रेयान्स जैन (सचिव), प्रमोद जगताप, निकेत जैन, प्रफुल जैन, सुजित जैन,नितीन जैन व विलास जैन आणि मंडळाचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात

August 24, 2026
जळगाव

माणूस केंद्रस्थानी असलेले साहित्यच चिरंतन – कवि किरण येले

August 24, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 24 ऑगस्ट 2026 !

August 24, 2026
जळगाव

महात्मा गांधीं’मुळे लेखक झालो – संतोष नागो शिंदे

August 23, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 23 ऑगस्ट 2026 !

August 23, 2026
अमळनेर

पाणी प्रश्नावरून आमदार अनिल पाटील यांनी पालिका अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल

August 22, 2026
Next Post

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, १२ ऑगस्ट २०२४ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चाळीसगाव, भडगाव व पाचोरा तालुक्यातील लम्पी स्किन डिसिज संसर्ग केंद्रापासूनचे १० किमी क्षेत्र बाधित घोषित

October 2, 2021

मद्य परवान्याच्या नावाखाली 9 लाखांची फसवणूक !

July 3, 2025

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 2 ते 9 फेब्रुवारी 2025 !

February 2, 2025

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे विचार हे समाजासाठी प्रेरणादायी – जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांचे प्रतिपादन

May 29, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group