TheClearNews.Com
Saturday, August 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळातील ‘त्या’ महिलेच्या खुनाचा उलगडा ; चारित्र्याच्या संशयाने पतीनेच केली हत्या

The Clear News Desk by The Clear News Desk
December 30, 2021
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) भुसावळ येथील सुचिता शुभम बारसे (वय २५) या महिलेच्या खुनाचा उलगडा अवघ्या काही तासात झाला आहे. कौटुंबिक वादातून महिलेचा पती तथा संशयीत आरोपी शुभम चंदन बारसे यानेच हा खून केल्याचे पोलिसांच्या चौकशीत निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

यासंदर्भात अधिक असे की, भुसावळ शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील सात नंबर पोलिस चौकीच्या मागे रात्रीच्या वेळेस महिलेचा खून झाल्याची घटना सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. शहरातील कवाडेनगर भागात राहणाऱ्या सुचिता ओमप्रकाश खरे (वय २७) या महिलेचा रात्रीच्या सुमारास धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ ठाण्याचे दिलीप भागवत, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रताप इंगळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोदकुमार गोसावी, संदीप दुनगहू, गणेश धुमाळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

READ ALSO

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

दोन तासांत संशयित अटकेत

शहरातील भीमवाडी झोपडपट्टी परिसरातील रहिवासी शुभम चंदन बारसे याचे पत्नी सुचिता बारसे यांच्यासोबत किरकोळ कारणावरून नेहमी वाद होत असत, तर सुचिता हिचे शुभमसोबत दुसरे लग्न झाले आहे. तिला पहिल्या पतीपासून चार वर्षांचा मुलगा आहे. या मुलाच्या सांभाळ करण्यावरून आरोपी शुभम व सुचिता यांच्यात भांडण सुरू असल्याचे सुचिताचे वडील ओमप्रकाश खरे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. तसेच शुभम हा सुचिताच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने त्यानेच तिची हत्या केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी शुभम बारसे यास अटक केली.

प्रेमसंबंधातून सुचिताने केला दुसरा विवाह

मृत सुचिता आणि तिचा पती शुभम यांचे शिक्षण शाळेत सोबत झाले होते. शिक्षणादरम्यान बारावीत असताना त्यांचे प्रेमसंबंध जुळले. या वेळी सुचिताच्या वडिलांनी शुभमला विवाहासाठी गळ घातली होती. मात्र, शुभमने आपले शिक्षण सुरू असल्यामुळे लग्न करण्यास नकार दिला होता. तेव्हा सुचिताचे वडील ओमप्रकाश खरे यांनी तिचा विवाह दुसरीकडे लावून दिला. तिला दोन वर्षांनंतर एक मुलगा झाला. मात्र यानंतर ती पतीला सोडून माहेरी राहण्यास आली. यादरम्यान तिने शुभमशी विवाह केला. विवाहानंतर दोघेही पोर्टल चाळीतील शुभमच्या घरी राहायला गेले. सुचिताला शुभमपासून दुसरा मुलगा झाला. यानंतर पहिल्या मुलाच्या सांभाळ करण्यावरून दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली. चार महिन्यांपूर्वीच दोघांमध्ये भांडण झाल्याचे सुचिताच्या वडिलांनी सांगितले. वादामुळे ती माहेरी गेली होती. मात्र मंगळवारी (ता. २८) ती पुन्हा आपल्या सासरी परतली, तर बुधवारी (ता. २९) सकाळी साडेआठच्या सुमारास तिच्या खुनाची बातमी समोर आली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
गुन्हे

पत्नीसह मुलाकडून डोक्यात हवा मारण्याचा पंप मारल्यानंतर गळा आवळून खून

August 13, 2026
गुन्हे

खाऊसाठी पैशांचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून अत्याचार

August 13, 2026
गुन्हे

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

August 12, 2026
Next Post

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केल्या नवीन मार्गदर्शक सूचना !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राज्यात जे काही कांड झालं त्यामागे ईडी, आता अडीच वर्षे ईडीच्या कार्यालयाला कुलूप लावा कारण….छगन भुजबळ म्हणाले !

July 9, 2022

जळगावात ६० वर्षीय वृध्दाची आत्महत्या !

September 29, 2020

चक्क ‘फोन पे’वर मागितली ३० हजारांची लाच ; सीबीआयकडून नौदल अधिकाऱ्याला अटक !

November 21, 2023

थकबाकी न भरणाऱ्या कोविड रुग्णालयांचा वीजपुरवठा होणार खंडित

March 10, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group