धरणगाव (प्रतिनिधी) २६ जानेवारी रोजी म्हणजेच ‘प्रजासत्ताक दिन’ या महत्वपूर्ण दिवसाचे औचित्य साधून मान्यवरांचा हस्ते ‘नीरा एज्युकेशन सॉफ्टवेअर’ चा ओपनिंग सेरेमनी उत्साहात संपन्न झाला.
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून “नीरा एज्युकेशन” चे लॉंचिंग मान्यवरांचा उपस्थितीत संपन्न झाले. सर्वप्रथम पी. आर. हायस्कूलचे मुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे व सा. दा. कुडे विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. एस. पाटील यांच्या हस्ते नीराच्या ऑफिसचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थांच्या उपस्थितीत औपचारिक कार्यक्रम सुरू झाला. सर्वप्रथम छत्रपती शिवराय व सरस्वती मातेच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात “नीरा एज्युकेशन सॉफ्टवेअर” नेमकं काय आहे? याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. सध्या इयत्ता १० वी व १२ वी ची ऑनलाइन व ऑफलाईन अशी परिपूर्ण तयारी या माध्यमातून करण्यात येईल. त्याचप्रमाणे भविष्यात ५ वी ते १२ वी आणि बँकिंग क्षेत्रात सुद्धा नीराचा आवाका वाढेल, असे प्रतिपादन राकेश पाटील यांनी केले. अतिथी मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. नीरा एज्युकेशन सॉफ्टवेअर चे लॅपटॉप व मोबाईलद्वारे लॉगिन करून मान्यवरांचा हस्ते उद्घाटन करण्यात आले. या वर्षी कोरोना काळ असल्याने सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षण खंडित झाले असतांना नीरा एज्युकेशनच्या माध्यमातून ९० दिवसांचे परिपूर्ण नियोजन देण्यात आले. यामध्ये अभ्यास, नियमित सराव, मॉक टेस्ट, बोर्डाच्या परीक्षेची परिपूर्ण तयारी करून घेण्याचे नियोजन सांगण्यात आले. शिक्षण ही एक अखंड सेवा आहे असं मानून नीरा च्या टीमने सर्व विद्यार्थ्यांना सराव पेपर्स व रिव्हिजन चार्ट चा सेट पूर्णपणे मोफत वितरित केला.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी लक्ष्मण पाटील यांनी विद्यार्थांना मायक्रो प्लॅनिंगचे महत्व समजावून सांगितले. त्याचप्रमाणे जीवनात नेहमी सकारात्मक विचार करण्याचा संदेश दिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. संजीवकुमार सोनवणे यांनी आपल्या विशिष्ट शैलीत विद्यार्थांना मौलिक मार्गदर्शन केले. ‘नीरा एज्युकेशन सॉफ्टवेअर’ तयार करणाऱ्या संपूर्ण टीम चे सरांनी भरभरून कौतुक केले. मराठी माध्यमातून शिक्षण घेणारे विद्यार्थी उच्च पदावर जाऊ शकतात, यासाठी मात्र प्रचंड मेहनत करणं आवश्यक आहे. अनेक उदाहरणे देऊन व विद्यार्थ्यांना सहज समजेल अशा ओघवत्या शैलीत डॉ. सोनवणे सरांनी शिक्षण, कुटुंब, रोजगार, समाज अशा विविध बाबतीत अनमोल मार्गदर्शन केलं.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शतकोत्तर संस्था पी. आर. हायस्कूलचे मुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून विकल्प ऑर्गनायझेशनचे लक्ष्मण पाटील उपस्थित होते. राकेश पाटील, समाधान पाटील व नितीन पाटील या उच्चशिक्षित तरुणांनी इयत्ता १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘नीरा एज्युकेशन सॉफ्टवेअर’ डेव्हलप करून ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी एक चांगले प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिले आहे. या ऑनलाइन व ऑफलाइन एज्युकेशन सॉफ्टवेअरच्या कार्यात भारती तिवारी, नाजनिन शेख, लक्ष्मण पाटील, चेतन पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परेश पाटील, सूरज पाटील, राहुल पाटील, उमेश पाटील यांच्यासह इयत्ता १० वी चे विद्यार्थी व नीरा एज्युकेशन च्या संपूर्ण टीम ने परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नीरा एज्युकेशन चे संचालक राकेश पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीरा एज्युकेशन चे संचालक नितीन पाटील यांनी तर आभार प्रदर्शन नीरा एज्युकेशनचे संचालक समाधान पाटील यांनी केले.