धरणगाव (प्रतिनिधी) काँग्रेचे जेष्ठ नेते सुरेश भागवत यांनी ठाकूर साहेबांशी संपर्क साधून त्यांना ताकीद दिली कि रस्त्यावरील खड्डे लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावे. जर चार पाच दिवसात रस्त्यावरील खड्डे दुरुस्त झाले नाहीत तर काँग्रेस कडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा काँग्रेसचे सरचिटणीस विकास लांबोळे यांनी दिला आहे.
आज धरणगाव काँग्रेस कडून सार्वजनिक बांधकाम विभागाला रस्त्यावरील खड्ड्या संदर्भात निवेदन देण्यासाठी गेले असता मुकेश ठाकूर हजर नव्हते. उपस्थित अधिकाऱ्याला त्यांचा बद्दल विचारले असता त्यांनी उडवा उडवीचे उत्तर दिले. ठाकूर साहेबांशी संपर्क केला असता त्यांना रस्त्यावरील खड्ड्या संदर्भात माहिती दिली आणि ते खड्डे दुरुस्ती करण्यासाठी सांगितले. यावेळेस काँग्रेसचे जेष्ठ नेते मा. सुरेश भागवत, नंदलाल महाजन, विजय जनकवार, सरचिटणीस रामचंद्र माळी, विकास लांबोळे, ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष प्रमोद जगताप, ओबीसी सेलचे शहर अध्यक्ष रवी महाजन, युवक चे सरचिटणीस योगेश येवले, चंदू लांबोळे व कार्यकर्ते उपस्थित होते.
















