जळगाव (प्रतिनिधी) चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विजबील तोडणी संदर्भात संतप्त झालेल्या आमदार मंगेश चव्हाण यांनी जळगाव येथील अधिकार्याला चक्क खुर्चीला बांधल्यानंतर खळबळ उडाली.दरम्यान, एमआयडीसी पोलीसांनी याप्रकरणी आ. मंगेश चव्हाण यांच्यासह काही शेतकऱ्यांनाही अटक केली आहे.
याबाबत महिती अधिक अशी की, चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी शेतकर्यांच्या विजेच्या समस्यांचे निराकरण व्हावे म्हणून आज शुक्रवार २६ मार्च रोजी वीज वितरणच्या जळगाव येथील एमआयडीसीतील मुख्य कार्यालयात धडक दिली. याप्रसंगी त्यांनी रूद्रावतार धारण करत आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह शेतकऱ्यांनी अधिकार्यांची खरडपट्टी काढली. तसेच त्यांच्या सोबत अनेक शेतकर्यांनी आपल्या समस्या मांडल्या. मात्र अधिकार्यांनी आपण कार्यवाही करत असल्याचे उत्तर दिले. तालुक्यातून गेल्या आठ दिवसात तब्बल सात हजार वीज कनेक्शन तोडण्यात आल्याबद्दलही त्यांनी जाब विचारला होता. समाधानकारक उत्तर न मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी शेख यांना खूर्चीला बांधलेल्या अवस्थेतच कॅबिनमधून मुख्य कार्यालयाच्या आवारात आणले होते, वेळीच एमआयडीसी पोलीसांनी दखल घेतल अधिक्षक अभियंता यांची सुटका केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसांनी आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह आंदोलक शेतकऱ्यांना अटक केली आहे.