जळगाव (प्रतिनिधी) मेडिकल अभ्यासक्रमाच्या पदवी प्रवेशासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) कडून घेण्यात आलेल्या पदवी स्तरावरील राष्ट्रीय पात्रता (नीट) प्रवेश परीक्षेचा निकाल सोमवारी रात्री जाहीर करण्यात आला. देशभरात लाखो विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. या परीक्षेत जळगावच्या उमैर रियाज देशपांडे या विद्यार्थ्याने नेत्रदीपक यश पटकावले आहे.
उमैर देशपांडे याने नीट मेडिकल परीक्षेत ७२० पैकी ६४२ गुण संपादन करून ९९.६४ पर्सनटाइल प्राप्त केले आहे. उमैर हा राज्य स्तरीय बॅडमिंटन पटू आहे. आपल्या खेळात खंड न पडू देता त्याने हे यश प्राप्त केले आहे. वडील देशपांडे मेडिकलचे संचालक रियाज देशपांडे व आई फरहाना देशपांडे यांचे मार्गदर्शन त्याला लाभले. आजोबा सलीम देशपांडे, आजी आयेशा देशपांडे तसेच काका देशपांडे हॉस्पिटलचे संचालक डॉ. परवेझ देशपांडे व डॉ. मोईज देशपांडे, रमीझ देशपांडे आणि समाज बांधवांकडून अभिनंदन व्यक्त करण्यात येत आहे.