धरणगाव (प्रतिनिधी) धरणगावातील बालकवी ठोंबरे स्मारक तात्काळ पूर्ण करणे, धरणगावातील अपूर्ण स्थितीत असलेले क्रीडासंकुल तात्काळ पूर्ण करणे, धरणगावातील शासकीय रुग्णालयातील कर्मचारी रुग्णांची गैरसोय करत आहे, अशी तक्रार संजय एकनाथ माळी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
संजय एकनाथ माळी यांनी तक्रार अर्जात म्हटले आहे की, धरणगावातील बालकवी ठोंबरे स्मारक तसेच क्रीडा संकुल अपूर्ण स्थितीत असून लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे. व तसेच धरणगावातील शासकीय रुग्णालयातील कर्मचारी रुग्णांची गैरसोय करत असल्याचे नागरिकांकडून तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत तक्रार अशी की, शुल्लक आजाराच्या कारणावरून रुग्णांना थेट जळगावला पाठविण्यात येते तरी रुग्णांची गैरसोय होणार नाही अशी व्यवस्था करण्यात यावी. अशी गावकऱ्यांकडून विनंती करण्यात येत आहे.
वशिला—
धरणगाव येथे फक्त वशिला असला तरच तेथील कर्मचारी लक्ष देत असतात, अन्यथा कोणी लक्ष देत नाही. तरी मुळ धरणगावातील कर्मचार्यांची बदली करून इतर गावातील कर्मचारी नियुक्त करावे