धरणगाव (प्रतिनिधी) नगरपरिषदेत सुरू असलेला भोंगळ कारभार सुधारता सुधरत नाही. प्रारूप प्रभाग रचना नकाशा हा दर्शनीय स्थळी लावावा लागतो. त्याचप्रमाणे अधिकाधिक नागरीकापर्यंत निवडणुकीची प्रारूप प्रभाग रचना पोहचविणे हे नगरपरिषदेचे कर्तव्य आहे. परंतु, नगरपरिषद तसे करतांना दिसत नाही. नगरपरिषदेच्या इमारतीत प्रवेश करतो त्याठिकाणी वरील नोटीस बोर्डावर आजतागायत प्रारूप प्रभाग रचना लावण्यात आलेली नसल्याचं भाजप ओबीसी जिल्हाध्यक्ष अँड.संजय महाजन म्हणाले.
का म्हणून प्रारूप प्रभाग रचना नागरिकांपासून लपवून ठेवली जात आहे?, एका राजकीय पक्षांच्या हितासाठी प्रभाग रचना तयार केलेली आहे का?, कोणीही हरकती घ्यायला नको म्हणून तर प्रारूप प्रभाग रचना बोर्डावर लावली नसेल?, या सर्व बाबीवर धरणगावकरांचे लक्ष हे लक्षात ठेवा, असंही ते म्हणाले.