TheClearNews.Com
Saturday, October 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शतकमहोत्सवी नाट्यसंमेलनानिमित्त जळगावात नाट्यकलेचा जागर !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 26, 2023
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) रंगभूमीची मध्यवर्ती संघटना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई आयोजित शतक महोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या निमित्ताने नाट्यसंस्कृतीची पंढरी असलेल्या संपूर्ण राज्यात जानेवारी २०२४ ते मे २०२४ या कालावधीत महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने व्यापक स्वरुपात साजरे करणार आहे. या संमेलनाच्या महत्वाचा भाग म्हणजे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील कलावंत व नाट्यकर्मींसाठी ‘नाट्यकलेचा जागर’ हा स्पर्धात्मक महोत्सव दि. १४ जानेवारी २०२४ पासून सुरु होणार आहे. या महोत्सवात सर्व कलावंतांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी केले आहे.

महाराष्ट्रातील विविध २२ केंद्रावर होणाऱ्या या नाट्यकलेचा जागर अंतर्गत जळगाव जिल्ह्यातदेखील अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या जळगाव जिल्हा शाखेतर्फे एकांकिका स्पर्धा, नाट्य अभिवाचन स्पर्धा, नाट्यछटा स्पर्धा, नाट्यसंगीत पद गायन स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धा प्राथमिक, उपांत्य व अंतिम फेरी अशा तीन फेऱ्यात होणार आहे. १४ जानेवारीपासून प्राथमिक फेरी सुरु होवून यातील निवडक कलाकृतींची उपांत्य फेरी घेण्यात येणार आहे. त्यानंतर मुंबई येथे अंतिम फेरी होणार आहे. अंतिम फेरीत निवड झालेल्या कलावंतांसाठी ४ दिवसीय नाट्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार असून, या कार्यशाळेत नाट्यक्षेत्रातील दिग्गज दिग्दर्शक, अभिनेते, अभिनेत्री मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेनंतर अंतिम फेरीतील संघांच्या सादरीकरणाचा दर्जा सर्वोत्तम असणार आहे.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 17 ऑक्टोबर 2026 !

महावितरणमध्ये ‘सन्मान सौदामिनींचा’

व्यावसायिक कलावंतांबरोबर प्रथमच महाराष्ट्रातील सर्व हौशी गुणवंत कलावंतांना शतक महोत्सवी नाट्यसंमेलनात आपली कला सादर करण्याची संधी या नाट्यकलेचा जागर महोत्सवातून मिळणार आहे. या स्पर्धात एकांकिका स्पर्धेत खास स्पर्धेसाठी लिखाण केलेल्या एकांकिकेस सर्वोत्कृष्ट रु. दोन लाख अथवा स्पर्धेतील सर्वोत्कृष्ठ एकांकिकेस रु.एक लाख, उत्कृष्ठ एकांकिकेस रु.७५ हजार, उत्तम एकांकिकेस रु.५० हजार व दोन उत्तेजनार्थ पारितोषिके रु.२५ हजार देण्यात येणार आहे. बालनाट्य स्पर्धेतील बालनाट्यांना सर्वोत्कृष्ट रु.७५ हजार, उत्कृष्ट रु.५० हजार, उत्तम रु.२५ हजार तर तीन उत्तेजनार्थ रु.१० हजारांची पारितोषिके देण्यात येणार आहेत.

नाट्य अभिवाचन स्पर्धेत सर्वोत्कृष्ट रु.२५ हजार, उत्कृष्ट रु.१५ हजार, उत्तम रु.१० हजार व दोन उत्तेजनार्थ रु.५ हजार आणि नाट्यसंगीत पद गायन स्पर्धेत सर्वोत्कृष्ट रु.२५ हजार, उत्कृष्ट रु.१५ हजार, उत्तम रु.१० हजार व दोन उत्तेजनार्थ रु.५ हजार पारितोषिके देण्यात येणार आहे. एकपात्री/नाट्यछटा स्पर्धेत सर्वोत्कृष्ट रु.१५ हजार, उत्कृष्ट रु.१० हजार, उत्तम रु.५ हजार, दोन उत्तेजनार्थ रु.अडीच हजार या पारितोषिकांसोबतच एकांकिका व बालनाट्य स्पर्धेसाठी लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाशयोजना, पार्श्वसंगीत, स्त्री अभिनय, पुरुष अभिनयाची पारितोषिके देण्यात येणार आहेत. तसेच सर्व सहभागी कलावंत, तंत्रज्ञ यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. एकांकिका स्पर्धेसाठी प्रवेश फी रु.१ हजार व बालनाट्यासाठी रु.५०० व इतर स्पर्धांसाठी रु.१०० राहणार आहे. ही प्रवेश फी व प्रवेश अर्ज ऑनलाईन भरावयाचे असून, त्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या www.natyaparishad.org या वेबसाईटवर लिंक देण्यात आली आहे.

प्रवेश घेण्याची अंतिम दिनांक ३१ डिसेंबर २०२३ आहे. नाट्यकलेचा जागर या स्पर्धा महोत्सवात जळगाव केंद्रासाठी केंद्रप्रमुख योगेश शुक्ल (९६५७७०१७९२), सहयोगी प्रमुख ॲड.संजय राणे, शरद पांडे , प्रा.शमा सराफ, पद्मनाभ देशपांडे (99231 38006), चिंतामण पाटील (8275709465), संदीप घोरपडे (94222 79710), प्रा. प्रसाद देसाई (9371688861), प्रा.स्वप्ना लिंबेकर – भट (7030545342) यांचेशी संपर्क करावा. तसेच जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी, कलावंतांनी, शाळा, संगीत विद्यालय, महाविद्यालय, हौशी नाट्यसंस्था, विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद जळगाव जिल्हा शाखेच्यावतीने अध्यक्षा ॲड.रोहिणीताई खडसे, नाट्यजागर विभाग प्रमुख शिवाजी शिंदे, मध्यवर्ती शाखा सदस्य गितांजली ठाकरे आणि कार्यकारिणी सदस्यांनी केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 17 ऑक्टोबर 2026 !

October 17, 2026
जळगाव

महावितरणमध्ये ‘सन्मान सौदामिनींचा’

October 16, 2026
जळगाव

‘सेवा संकल्पा’ला गती; महावितरणचे अध्यक्ष श्री. लोकेश चंद्र यांचा लाभार्थ्यांशी थेट संवाद!

October 16, 2026
अमळनेर

अखेर बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात; शेतकऱ्यांची दहशतीतून सुटका

October 16, 2026
भुसावळ

वासुदेव ज्येष्ठ नागरिक संघातर्फे ४९ ज्येष्ठ नागरिक कार्डांचे वितरण

October 16, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 ऑक्टोबर 2026 !

October 16, 2026
Next Post

दुय्यम निबंधक भारती रविंद्र पाटील यांचा संभाजी ब्रिगेडच्या वतीने सत्कार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गांधी रिसर्च फाऊंडेशनद्वारा आयोजित न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी व्याख्यानमालेत दुसरे पुष्प गुंफणार देवाजी तोफा !

December 25, 2022

भारतीय सैन्याच्या नावाखाली ट्रक ड्रायव्हरला ६२ हजारात गंडवले ; धरणगाव पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा !

August 19, 2022

Today Horoscope : आजचं राशिभविष्य, गुरुवार १९ सप्टेंबर २०२४ !

September 19, 2024

Chopda Murder | चारित्र्याच्या संशयातून चोपड्यात पतीने केली २५ वर्षीय पत्नीची हत्या !

July 29, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group