TheClearNews.Com
Tuesday, September 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धावत्या लक्झरीमधून २५ लाखांची बॅग चोरीचा पर्दाफाश; पाच अटकेत

vijay waghmare by vijay waghmare
July 17, 2026
in गुन्हे, जळगाव, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – धावत्या लक्झरी बसमधून २५ लाख रुपयांची रोकड असलेली बॅग लंपास करणाऱ्या चौघा सराईत आरोपींना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही दिवसांत अटक करत मोठे यश मिळविले आहे. या कारवाईत चोरीस गेलेली संपूर्ण २५ लाख रुपयांची रोकड आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली ५ लाख रुपये किमतीची मारुती डिझायर कार असा एकूण ३० लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ (क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.

READ ALSO

मागील भांडणावरुन दाम्पत्याकडून महिलेवर चाकूने वार

रक्षाबंधनानिमित्त घर बंद; चोरट्यांनी १ लाख २८ हजारांचा ऐवज केला लंपास

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पारोळा येथील नितीन पुरुषोत्तम वाणी हे जळगावातील सराफ व्यावसायिक प्रफुल्ल भागचंद सुराणा यांच्याकडे गेल्या १५ वर्षांपासन खासगी करिअरचे काम करतात. दि. ११ जुलै २०२६ रोजी ते कोल्हापूर येथे चांदी खरेदीसाठी २५ लाख रुपयांची रोकड घेऊन हरेकृष्णा ट्रॅव्हल्सच्या लक्झरी बसने निघाले होते. सायंकाळी सुमारे ८.३० वाजता बस छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फर्दापूर येथील साई सुरुची लॉजिंग अँड रेस्टॉरंट येथे जेवणासाठी थांबली.

मुख्य आरोपीवर वेगवेगळे गुन्हे

मुख्य आरोपी सोनू उर्फ राम भगवान सारवाण याच्याविरुद्ध यापूर्वीही जळगाव शहर, शनिपेठ आणि भुसावळ लोहमार्ग पोलीस ठाण्यांत मारहाण, दरोडा, घरफोडी, चोरी आणि शासकीय कामात अडथळा आणण्यासह विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

जेवणाला गेले अन् बॅग लंपास

नितीन वाणी जेवणासाठी खाली उतरले असता त्यांनी रोकड असलेली बॅग बसमध्येच ठेवली होती. जेवण करून परत आल्यानंतर बॅग जागेवर नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. प्रवाशांचा विलंब टाळण्यासाठी बस पुढे रवाना झाल्यानंतरही बॅगेचा शोध लागला नाही. त्यानंतर अज्ञात व्यक्तींविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

तपासात कबुली; गुन्ह्याची उकल

या गंभीर गुन्ह्याचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेला तांत्रिक आणि गोपनीय माहितीच्या आधारे हा गुन्हा सराईत आरोपी सोनू उर्फ राम भगवान सारवाण (वय ३२, रा. गुरुनानक नगर, शनिपेठ, जळगाव) याने केल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देत आपल्या तीन साथीदारांची नावे उघड केली. यानंतर पोलिसांनी शेख रहेमान शेख निसार (वय ३३, पिंप्राळा हुडको), सचिन उर्फ मंगेश सूर्यकांत झांबरे (वय ३८, कोल्हे नगर) आणि दशरथ सुरेश चौधरी (वय ३६, खंडेराव नगर, पिंप्राळा) या तिघांनाही ताब्यात घेतले. चौघांनीही गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तपासात आरोपी शेख रहेमान याने गुन्हा करण्यासाठी स्वतःची मारुती डिझायर (एमएच-४७-सीयू-७८७७) उपलब्ध करून दिल्याचे निष्पन्न झाले. आरोपींकडून चोरीस गेलेली संपूर्ण २५ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली असून, गुन्ह्यात वापरलेली कारही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaon

Related Posts

गुन्हे

मागील भांडणावरुन दाम्पत्याकडून महिलेवर चाकूने वार

August 31, 2026
गुन्हे

रक्षाबंधनानिमित्त घर बंद; चोरट्यांनी १ लाख २८ हजारांचा ऐवज केला लंपास

August 31, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशिभविष्य 31 ऑगस्ट 2026 !

August 31, 2026
जळगाव

जळगावच्या ग्रामीण भागातून आंतरराष्ट्रीय व्यापार मंचावर झेप; निर्मल नेमाडे यांची IACCIच्या आंतरराष्ट्रीय व्यापार प्रोत्साहन समितीवर निवड

August 30, 2026
गुन्हे

पंक्चर झालेल्या वाहनासह त्यातील कटलरीचे साहित्य चोरट्यांनी नेले चोरुन

August 30, 2026
जळगाव

जळगाव जिल्हा कृषि औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात*

August 29, 2026
Next Post

"शिक्षणासाठी हातभार" : बी जे महाजन विद्यालय अनोरे येथे गरीब विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप...!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘नाना पटोले हे महाराष्ट्राचे पप्पू’ : चंद्रकांत पाटील

July 10, 2021

जैन इरिगेशनला निर्यातीत सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल प्लेक्स कौन्सिलची तेरा पारितोषिके

April 16, 2022

गिता योगेश वाघ यांची राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाच्या धरणगाव शहराध्यक्षपदी निवड !

November 25, 2022

“लक्ष्मी” चित्रपटावर बंदी लावा – हिंदू जनजागृती समितीची मागणी

November 6, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group