जळगाव प्रतिनिधी – भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन तर्फे शनिवार दि. १६ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ६.०० वाजेपासून कै. बॅरिस्टर निकम चौक मैदान – सागर पार्क वर युवतींच्या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. दहीहंडी पथकात यंदा प्रथमच युवतींचे ११ संघ सहभागी होत आहेत. प्रत्येक संघात ७० ते ८० गोपिका असून एकूण ५०० युवती गोविंदांनी कसून सराव सुरू केला आहे. यंदा ५ थरांपर्यंत सराव करत असल्याची माहिती आयोजकांनी दिली. महाराष्ट्रात ही एकमेव युवतींची दहीहंडी गेल्या १७ वर्षांपासून सुरू आहे. या उत्सवासाठी संघाची तयार अंतिम टप्प्यात आली आहे. गोपिकांच्या दहीहंडीत विविध चित्तथरारक कवायती, रोप मल्लखांब, सांस्कृतिक नृत्य आदी. प्रात्यक्षिके सादर करण्यात येणार आहे. तसेच शौर्यवीर, पेशवा, वज्रनाद या ढोलपथकाचे ४१२ वादक पुणेरी ढोल-ताशाच्या माध्यमातून वातावरण निर्मिती करणार आहेत. दरवर्षी हा उत्सव पाहण्यासाठी सुमारे २० हजारांवर जळगावकर नागरिक सहकुटुंब उपस्थित राहत असल्याचे आयोजकांनी सांगितले.
उत्सवासाठी ही आहेत गोपिकांची अकरा पथके-
गोपिंकांची दहीहंडी फोडण्यासाठी यंदा प्रथमच अकरा युवतींचे पथके येणार आहेत. या पथकामध्ये किडस् गुरूकुल शाळा, नुतन मराठा महाविद्यालय, मूळजी जेठा महाविद्यालय, ॲङ एस. ए. बाहेती महाविद्यालय, के.सी.ई. सोसायटी मुलींचे वसतीगृह, जी. एच. रायसोनी महाविद्यालय, हरिजन कन्या छात्रालय, के. के. इन्स्टीट्युट ऑफ योगा, एकलव्य क्रीडा संकुल, आर. आर. शाळा, एन.सी.सी. या पथकांचा समावेश आहे.
कोट
युवतींना हक्काचे मिळाले व्यासपीठ-
संपूर्ण महाराष्ट्रातून युवतींची ही एकमेव दहीहंडी आहे. युवतींच्या दहीहंडीचे हे १७ वे वर्ष असून, दहीहंडी सारख्या मोठ्या उत्सवात पुरूषांप्रमाणे तरूणींचा सहभाग वाढावा व त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने ही दहीहंडी सुरू केली आहे. यात यंदा तब्बल ११ संघ सहभागी झाल्याने हा संघ यशस्वी होत आहे. मानवी मनोरे बनविणे या खेळाला महाराष्ट्र शासनातर्फे साहसी खेळाचा दर्जा देण्यात आला आहे. लवकरच हा खेळ शाळा व महाविद्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात खेळला जाईल.
– अशोक जैन
अध्यक्ष, जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.
आपली
यामिनी कुळकर्णी
प्रसिद्धी प्रमुख
युवतींची दहीहंडी उत्सव समिती
9422222699