जळगाव \ भुसावळ
मुक्ताईनगर बोदवड मतदार संघातून पक्ष उमेदवार लढवणारे विनोद सोनवणे यांच्यावर मंगळवारी अज्ञात व्यक्तींनी गोळीबार करून पळ काढला होता. यातील तीन संशयतांना अटक करण्यात आली असून दोघांचा शोध सुरू आहे. दरम्यान गोळीबार मागे कुठलाही राजकीय वाद नसून फक्त दहशत माजवून उमेदवाराकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न होता, असे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर श्रेड्डी यांनी सांगितले. तसेच विधानसभा निवडणुकीत निवडणूक लढविणाऱ्या ४९ उमेदवारांना निवडणूक काळासाठी शस्त्रधारी अंगरक्षकाची सुरक्षा पुरविली जाणार आहे. याबाबतचा निर्णय जिल्हास्तरीय समितीने घेतला असल्याची माहिती देखील पोलीस अधीक्षक रेड्डी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
मुक्ताईनगर बोदवड मतदार संघातून अपक्ष उमेदवारी करणारे विनोद सोनवणे यांच्यावर मंगळवारी दुपारी अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार करून दहशत वाजवण्याचा प्रयत्न केला होता. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्या जिल्हास्तरीय समितीने निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या जीवीताला असलेल्या धोक्याबाबत तपासणी करून एक शत्रधारी अंगरक्षक पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. यात जिल्ह्यातील ११ मतदारसंघातील ४९ उमेदवारांना, अशा प्रकारची सुरक्षा दि. ६ पासून पुरविली जाईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी दिली. तसेच ही सुरक्षा केवळ निवडणूक काळासाठी राहणार असून भविष्यात पुन्हा सुरक्षा देण्याच्यादृष्टीने जिल्हास्तरीय समिती आवश्यक तो निर्णय घेणार असल्याचे डॉ. रेड्डी यांनी सांगितले.