धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील गौतम नगर भागात एकाच रात्रीतून तीन बंद घरे फोडल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील गौतम नगर भागात एकाच रात्रीतून तीन बंद घरे फोडल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. चोरट्यांनी तीन घरातील सामान अस्तव्यस्त रोकडसह सोने चांदीचे दागिने लंपास केले. या प्रकरणी वैशाली पवार यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार चोरट्यांनी त्यांच्या घरातून ४० हजार रोख तसेच सोने-चांदीचे दागिने असा एकूण ५४ हजाराचा ऐवज लंपास केला आहे. इतर दोन घरातून देखील किरकोळ रोकड चोरी झाल्याचे कळतेय. दरम्यान, एकाच रात्रीतून तीन घर फोडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी देखील होत आहे.