चोपडा ( प्रतिनिधी) रस्ते व शहर विकासात चोपडे शहराचा क्रमांक संपूर्ण महाराष्ट्रात खालून वर एक क्रमांकाचा असून आजमितीस अनेक रस्त्यांवर विशेषता गजबजलेल्या बाजारपेठेत चिखल, माती, गारा, आणि खड्ड्यांनी भारी वाड्यात जलमय झाला आहे. पालिका प्रशासन याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे.
चोपडा शहरात बाजारपेठ, गांधी चौक गोल मंदिर ते राणी लक्ष्मीबाई चौक या परिसरात जागोजागी रस्ते उखडले असून, या रस्त्यांवर जलवाहिन्या फुटून वाहतात, काही लिकेज दिवसभर सुरू असतात यामुळे चिखल गारा व माती व डबके जागोजागी साचलेले दिसतात. चोपडा पालिकेने चांगले कॉंक्रिटीकरणाचे रस्ते खोदून काय साधले असा सवाल नागरिकांनी केला आहे? शहरात गांधी चौकात आणि ए.जी . लोहाना यांचे घर ते महेश प्लायवुड या भागा पर्यंत रस्त्यात खड्डे व खड्ड्यात पाणी साचलेले दिसते. हे पाहून असे वाटते की शहरात रोज पाऊस पडतो की काय?
भर हिवाळ्यात अशा प्रकारचे जलमय रस्ते, धूळ माती गारा चिखल याचे साम्राज्य सर्वत्र पसरलेले दिसते. चोपडा नगरपालिकेने शहरातील अंतर्गत रस्ते तातडीने दुरुस्त करावेत अशी मागणी नागरिकांनी केली आहे.