धरणगाव (प्रतिनिधी) येथून जवळच असलेल्या निशाने फाट्याजवळ आज सकाळी झालेल्या भीषण अपघातातीळ मृतांची संख्या तीन झाली आहे. या अपघातात एक तरुण जागीच ठार झाला होता. अन्य दोघांचा जळगाव नेत असताना वाटेतच मृत्यू झाला आहे.
आज सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास दोन दुचाकींना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत मोटरसायकलवर असलेले सहाही जण रस्त्याच्या कडेला फेकले गेले. यातील सुना मोहनलाल भिलाला (वय 23) हा तरुण मयत झाला आहे. तर पिंकी मूहलाल भिलाला( वय 22, रा.मध्य प्रदेश), नारायण लालसिंग बारेला (वय 20,रा.साळवा), दिलीप बारेला (वय 25 रा.साळवा), भरत बारेला (रा. साळवा), संगीता सिताराम भिलाला ( रा. मध्य प्रदेश) असे गंभीर जखमी झाले झाले होते. यातील दोघांचा जळगावला नेत असताना वाटेतच मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता या अपघातातील मृतांची संख्या तीनवर पोहोचली आहे.