धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) धरणगाव संस्थेत विहित मुदतीत प्रवेश अर्ज सादर न करू शकणाऱ्या उमेदवारांना ४ थ्या फेरीमध्ये प्रवेशाची संधी उपलब्ध झाली आहे. त्यासाठी उमेदवारांनी ५ ऑक्टो ते ७ ऑक्टोबरपर्यंत फॉर्म भरावे.
नवीन विद्यार्थ्यांना शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) धरणगाव संस्थेत खालील अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो. सदरील प्रवेश जागा खालील प्रमाणे. COPA -10 जागा, POCM- 04 जागा , Dress making- 6 जागा, Cosmotology – 11 जागा उपलब्ध आहेत. शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी आहे, त्यांनी त्वरित प्रवेश अर्ज दाखल करण्याचे आवाहन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था धरणगावचे प्राचार्य एम.ए. मराठे यांनी केले आहे.