चोपडा (प्रतिनिधी) माहेरहून २५ लाख रुपये आणले नाही, म्हणून विवाहित महिलेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह पाच जणांविरुद्ध चोपडा ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात अधिक असे की, कांचन रमेश ठाकरे (वय ३०, रा. कोळंबा, ता. चोपडा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दिनांक १२ फेब्रुवारी २०१३ पासून ६ महिन्यानंतर वेळोवेळी ७ मे २०२१ पर्यंत उमेश प्रल्हाद ठाकरे (रा. सुयोग कॉलनी, जळगाव ह.मु. वर्डी ता. चोपडा), मंदाबाई प्रल्हाद ठाकरे, अविनाश प्रल्हाद ठाकरे, सदाशिव रामा सपकाळे, भरती सदाशिव सपकाळे (रा. तळेले कॉलोनी, जळगाव) यांनी संगनमत करून कांचन ठाकरे हीने २५ लाख रुपये माहेरहून घर घेण्यासाठी आणले नाही, म्हणून शारीरिक व मानसिक छळ केला. याप्रकरणी उमेश प्रल्हाद ठाकरे, अविनाश प्रल्हाद ठाकरे, सदाशिव रामा सपकाळे यांच्यासह दोन महिलांविरुद्ध चोपडा ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेका भारत रामजी नाईक हे करत आहे.