TheClearNews.Com
Tuesday, March 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वर्षानुवर्षे वीजबिले न भरणाऱ्या साडेसव्वीस हजार कृषिपंपधारकांकडे १९२ कोटींची थकबाकी !

महा कृषी ऊर्जा अभियानात ३० टक्के सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 25, 2023
in जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात वर्षानुवर्षे वीजबिल न भरणाऱ्या साडेसात अश्वशक्तीहून अधिक विद्युतभार असलेल्या तब्बल साडेसव्वीस हजार कृषिपंपधारकांकडे १९२ कोटी रुपयांची थकबाकी आहे. या कृषिपंपधारकांसह जिल्ह्यातील सर्वच शेतकऱ्यांनी ३१ मार्च २०२३ पर्यंत महा कृषी ऊर्जा अभियानात थकबाकी भरून ३० टक्के सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

शेतकऱ्यांना सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणने कंबर कसली आहे. रोहित्र नादुरुस्त झाल्यास ते बदलण्याची प्रक्रियाही गतिमान करण्यात आली आहे. तरीही कृषिपंपाचे वीजबिल भरण्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याने थकबाकीत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे साडेसात अश्वशक्तीपेक्षा अधिक विद्युतभार असलेल्या जिल्ह्यातील २६ हजार ५३४ ग्राहकांकडे १९२ कोटी रुपये थकबाकी आहे. यात ५ ते १० वर्षे बिल न भरलेले १४ हजार ९३९ ग्राहक, १० ते १५ वर्षे बिल न भरलेले ५०३६ ग्राहक व १५ वर्षाहून अधिक काळ एकही बिल भरलेले ६ हजार ५५९ ग्राहक आहेत. अशावेळी महावितरण विजेचे नियोजन कसे करणार यावर थकबाकीदार शेतकऱ्यांनी विचार करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.
महावितरण वीज निर्मिती करत नाही, तर विविध स्रोतांकडून दरमहा वीज विकत घेऊन ती वीज आपल्या ग्राहकांना वितरीत करीत असते. असे असताना महावितरणच्या सर्वच वर्गवारीतील ग्राहकांनी वेळेत वीजबिल भरणे गरजेचे आहे. परंतु शेतीसाठी सवलतीचा वीजदर असतानाही शेतकरी बांधव वीजबिल भरण्याला प्रतिसाद देत नसल्याची परिस्थिती आहे. सध्या महावितरणची राज्यात ५० हजार कोटीपेक्षा जास्त थकबाकी आहे. त्यामुळे थकबाकीत आणखी वाढ होणे हे महावितरणच्या अस्तित्वासाठी धोक्याची बाब असल्याचे स्पष्ट होते.

READ ALSO

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

महावितरण ग्राहक सेवेसाठी बांधिल आहे. महावितरणच्या एकूण महसुलापैकी ८५ टक्के खर्च हा वीजखरेदीवर होत असतो आणि उर्वरित १५ टक्क्यात घेतलेल्या कर्जावरील व्याज, देखभाल-दुरूस्ती आणि इतर प्रशासकीय खर्च करण्यात येतो. कृषी क्षेत्राची दिवसेंदिवस वाढत असलेली थकबाकी हा महावितरणचा चिंतेचा विषय बनलेला असून महावितरणच्या मुख्यालयाने याची नुकतीच गांभीर्याने दखल घेतली आहे. त्यामुळे थकबाकीचा ग्राहकसेवेवर परिणाम होऊ नये याचा शेतकरी ग्राहकांनी देखील विचार करून थकीत वीजबिल भरून सहकार्य करावे.

मार्चपर्यंत ३० टक्के सवलतीचा लाभ घ्या
दरम्यान, महावितरणतर्फे २०२१ पासून महा कृषी ऊर्जा अभियान राबवले जात असून, जानेवारी २०२१ ते मार्च २०२२ पर्यंत यावर ५० टक्के सूट देण्यात आलेली होती. दरम्यान, ३१ मार्च २०२३ पर्यंत थकबाकी भरणाऱ्या कृषीपंप ग्राहकांना थकबाकीवर ३० टक्के सूट देण्यात येत असून, विलंब आकार व व्याज पूर्णतः माफ करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे महावितरणने केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

March 24, 2026
गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

March 23, 2026
गुन्हे

सासरवाडीला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

March 23, 2026
Next Post

चाकूच्या धाकावर तरुणाकडून लुटला ६५ हजारांचा ऐवज ; मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राज्यसभेत खासदारांना मारहाण ; राहुल गांधींसह विरोधकांचं संसदेबाहेर आंदोलन !

August 12, 2021

चोपडा मतदार संघातील ठाकरे गटाचे उमेदवार प्रभाकरआप्पा सोनवणे यांना हृदयविकाराचा त्रास !

October 31, 2024

देशाला दुसऱ्या फाळणीकडे नेण्याच्या कॉंग्रेसच्या षडयंत्रात ‘उबाठा’ही सहभागी !

May 10, 2024

चालत्या बसमध्ये महिला कंडक्टरचा विनयभंग; जळगाव एमआयडीसी पोलिसात गुन्हा !

February 28, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group